सोलापूर एसटी विभागाचा सिमेंट वाहतुकीसाठी पहिला वार्षिक करार 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 15 September 2020

सोलापुर विभागात सुरवातीला जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु होती. मात्र त्यावेळी केवळ सोलापूर-अक्कलकोट बसफेऱ्यांना प्रतिसाद होता. आंतर जिल्हा बसवाहतूकीनंतर मात्र आता प्रवशांचा प्रतिसाद वाढला आहे. एका सिटवर एकच प्रवासी या नियमामुळे भारमान कमी झाले आहे. त्यावर उपाय म्हणून एखाद्या गावाला जाण्यासाठी पुरेसी प्रवासी संख्या झाली तर मागणीनुसार एसटी फेरी द्यायची असे धोरण घेतले गेले. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी आता मागणीनुसार जादा गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे पुण्याच्या बसफेऱ्या वाढल्या आहेत. पूणे, बार्शी, पंढरपूर व अक्कलकोटसाठी होणारी प्रवासी वाहतूक सर्वाधिक आहे. 

सोलापूरः जिल्हाभरात एसटीची चाके आता पूर्ण क्षमतेने धावू लागली असून एसटीच्या सोलापूर विभागाने सिमेंट कंपनीसोबत मालवाहतुकीचा पहिला करार केला आहे. लवकरच स्थानिक उद्योगासोबत मोठे करार करण्याची तयारी सुरू झाली आहे. लॉकडाउन नंतर प्रवासी व मालवाहतुक या दोन्ही बाबीत विभागाची जोरदार उत्पन्नाची सुरुवात झाली आहे. 

हेही वाचाः राज्य सरकारची अनलॉककडे वाटचाल ; शिरस तहसील कार्यालय मात्र लॉक 

सोलापुर विभागात सुरवातीला जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु होती. मात्र त्यावेळी केवळ सोलापूर-अक्कलकोट बसफेऱ्यांना प्रतिसाद होता. आंतर जिल्हा बसवाहतूकीनंतर मात्र आता प्रवशांचा प्रतिसाद वाढला आहे. एका सिटवर एकच प्रवासी या नियमामुळे भारमान कमी झाले आहे. त्यावर उपाय म्हणून एखाद्या गावाला जाण्यासाठी पुरेसी प्रवासी संख्या झाली तर मागणीनुसार एसटी फेरी द्यायची असे धोरण घेतले गेले. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी आता मागणीनुसार जादा गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे पुण्याच्या बसफेऱ्या वाढल्या आहेत. पूणे, बार्शी, पंढरपूर व अक्कलकोटसाठी होणारी प्रवासी वाहतूक सर्वाधिक आहे. 

हेही वाचाः माळशिरसमधील 16 हजार हेक्‍टर उस गाळपासाठी मात्र उभ्या उसाचा प्रश्‍न कायम ! 

दररोजच्या उत्पन्नात आता वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता.14) रोजी दिवसभरात विभागाला 12 लाख 77 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळात एसटीने शेतमाल वाहतूक व इतर मालाची वाहतूक सुरु केली आहे. त्यातून आतापर्यत 8 लाख उत्पन्न मिळाले आहे. शहरातील होटगी रोडवरील एका सिमेंट कंपनीसोबत सोलापूर विभागाने माल वाहतुकीचा पहिला करार केला आहे. या वार्षिक कराराद्वारे सिमेंटची वाहतूक विवीध शहरामध्ये केली आहे. त्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. या पध्दतीने सोलापूरमधील अनेक कंपन्यासोबत करार केले जाणार आहेत. सोलापूर विभाग नियंत्रक डी.जी.चिकोर्डे यांनी सांगितले की, प्रत्येक स्थानकावर बस गाड्यांचे सॅनिटायझींग केले जात आहे. सोशल डिस्टन्स ठेवले जात ्आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी प्रवास अधिक सुरक्षीत ठरला आहे. 

सोलापूर विभागाची प्रगती 
- आतापर्यंतचे उत्पन्न 9.98 कोटी रुपये 
- भारमान - 40 
- मालवाहतूक - आठ लाख रुपये उत्पन्न 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Annual Contract for Cement Transport of Solapur ST Division