रिक्षाचालकाची मानसकन्या बनली गावातील पहिली डॉक्‍टर 

सुस्मिता वडतिले
Thursday, 26 March 2020

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील तिल्हेहाळ गावातील पहिली महिला डॉक्‍टरचा मान शितलने पटकावला आहे. स्वत:च्या जिद्दीने व मेहनतीने शिक्षण घेऊन एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. सध्या शितलचे 23 वय सुरु आहे. तिची आई अमृता धायगुडे आशावर्कर आहे. वडील श्रीमंत धायगुडे फॅक्‍टरीमध्ये काम करतात. तिला तिचे मामा रिक्षाचालक सिद्राम चोपडे यांना मुलगी नसल्यामुळे शितल ला मुलगी मानली आणि लहानापासूनचे शिक्षण पूर्ण केले.

सोलापूर : उघड्या डोळ्यांतील स्वप्न... उरात स्वप्नपूर्तीचा ध्यास आणि त्यासाठी करावे लागणारे कठोर परिश्रम म्हणजे यश..., असे स्वप्न आणि स्वप्नपूर्तीचा प्रवास करणारी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील तिल्हेहाळ गावातील रिक्षाचालकाची मानसकन्या शितल धायगुडे डॉक्‍टर बनली आहे. तिचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील तिल्हेहाळ गावातील पहिली महिला डॉक्‍टरचा मान शितलने पटकावला आहे. स्वत:च्या जिद्दीने व मेहनतीने शिक्षण घेऊन एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. सध्या शितलचे 23 वय सुरु आहे. तिची आई अमृता धायगुडे आशावर्कर आहे. वडील श्रीमंत धायगुडे फॅक्‍टरीमध्ये काम करतात. तिला तिचे मामा रिक्षाचालक सिद्राम चोपडे यांना मुलगी नसल्यामुळे शितल ला मुलगी मानली आणि लहानापासूनचे शिक्षण पूर्ण केले. शितलने सिध्देश्‍वर प्रशालेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले तर संगमेश्‍वर महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तिने एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी 2014 साली कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर 2020 मध्ये एमबीबीएस पदवी संपादन केली. आपली माणसे, आपले गाव यांना आरोग्य सुविधा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तिने डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पाहिले. याचा खूप मोठा आनंद तिच्या कुटुंबीयांना आणि तिच्या गावाला झाला आहे. शितलच्या घरच्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांना आनंदी पाहण्यासाठी तिला आणखीन खूप शिकायचे आहे. तसेच तिला समाजसेवाही करण्याची आवड आहे. 
शितल सारख्या सावित्रीच्या लेकी आपल्या कर्तुत्वातून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान तर देतातच. सोबत स्वतः इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असतात. शितलने केलेल्या बिकट परिस्थितीचा सामना आणि घेतलेल्या मेहनतीचे फळ तिला भेटले आहे. आपल्या कर्तृत्वाचा झेंडा शितलने डॉक्‍टर बनून गावात रोवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first doctor in the village to become the daughter of a rickshaw driver