कोरोना असतानाही ठाण्यातून कुटुंब आले; तालुक्यात प्रवेश केला अन्‌... 

अण्णा काळे
सोमवार, 22 जून 2020

मुंबईवरुन (ठाणे) आपल्या गावाकडे एकजण येत असल्याची माहिती गावातील सरपंचाच्या मुलाला माहिती झाली. मात्र त्याने तुम्ही सध्या गावात येऊ नका, येईचे असेल तर तपासणी करुनच या, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र त्यावरही गावाकडे येणाऱ्याने ऐकले नाही. दरम्यान तरुणाने ठाण्यातील काहीजणांकडे त्याच्याबाबत चौकशी केली असता.

करमाळा (सोलापूर) : मुंबईवरुन (ठाणे) आपल्या गावाकडे एकजण येत असल्याची माहिती गावातील सरपंचाच्या मुलाला माहिती झाली. मात्र त्याने तुम्ही सध्या गावात येऊ नका, येईचे असेल तर तपासणी करुनच या, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र त्यावरही गावाकडे येणाऱ्याने ऐकले नाही. दरम्यान तरुणाने ठाण्यातील काहीजणांकडे त्याच्याबाबत चौकशी केली असता. संबंधीत आजारी असल्याचे समजले. त्यानंतर तरुणाने प्रशासनाला याची कल्पना दिली, आणी तो येणार असलेल्या वाटेवर काहीजणांना थांबले. अल्याबरोबर त्यांना तपासण्यासाठी पाठवले तर त्यात संबंधीत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सतर्कतेमुळे तालुक्यातील कोणीही त्यांच्या संपर्कात आले नसल्याचे सांगितले जात आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून अडीच महिने होत आले. अशात सोलापूर जिल्ह्यातही दिवसांदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाच्या दक्षतेमुळे तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला करमाळा तालुका कोरोनामुक्त राहिला. सोमवारी मात्र एक रुग्ण सापडल्याची नोंद झाली. या रूग्णांचा प्रत्यक्ष करमाळा तालुक्यातील कोणाशीही संपर्क झालेला नाही. हा रूग्ण अतकोनेश्वरनगर (कळवा, ठाणे) येथून आलेला आहे. झरे येथील ग्रामव्यवस्थापन समीतीने वेळीच दखल घेऊन संबंधित रूग्णांला गावात प्रवेश न देता करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर तेथून उपचारासाठी संबंधितांना सोलापूरला पाठवण्यात आले आहे. सध्या या रूग्णांवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वोपच्चार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झरे येथील सरपंच सुनिता पाटील यांचे चिरंजीव प्रशांत पाटील यांना संबंधित कुठुंब ठाणे येथुन गावात येणार असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ही त्यांना मिळाले होती. त्यामुळे पाटील यांनी तात्काळ ग्रामव्यवस्थापन समीतीची बैठक घेऊन संबंधित कुंठुब गावात येऊ न देता तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदार समीर माने, करमाळा पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांनी कल्पना दिली.
प्रशांत पाटील व पोलिस पाटील हनुमंत पाटील यांनी संबंधित कुठुंबाकडे मोबाईलवरून विचारपूस करता ते कळवा येथुन झरेकडे निघाल्याची खात्री झाल्यावर झरे गावाकडे येणारऱ्या रस्त्यावर वीट येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराज घोगरे, प्रशांत पाटील, पोलिस पाटील हनुमंत पाटील, पोलिस नाईक फिरोज आत्तार, पोलिस कॉन्स्टेबल अतुल लवळे यांनी सायंकाळी संबंधित गाडी आढवली. त्यानंतर त्यांना थेट उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. येथे चारपैकी एकास कोरोनाची लक्षणे असल्याचे दिसुन आल्याने तात्काळ सोलापूर येथे हालवण्यात आले. 

तहसीलदार समिर माने म्हणाले, झरे (ता. करमाळा) येथील पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील (कुटूंबीय) तीन जणांना इन्स्ट्यूट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालूक्यातील कोणीही सदर रूग्णाच्या संपर्कात आलेले नाही. तालूक्यातील नागरिकांनी घाबरू नये; मात्र खबरदारी घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first positive patient of Corona was found in Karmala taluka