प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच ! आठ महिन्यात द्याव्या लागणार दोन परीक्षा

तात्या लांडगे
Wednesday, 30 December 2020

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे नियोजन
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे आगामी शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्याचे नियोजन होते. मात्र, बहुतेक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेसह प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जुलैपर्यंत 2020-21 मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपवून आगामी शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे.
- डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र- कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सोलापूर : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या शैक्षणिक वर्षाची घडी बसविण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी न देता परीक्षेपूर्वी अभ्यासाकरिता दहा दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. जुलैपर्यंत दोन्ही सत्राची परीक्षा संपवून 1 ऑगस्टपासून आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे नियोजन
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे आगामी शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्याचे नियोजन होते. मात्र, बहुतेक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेसह प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जुलैपर्यंत 2020-21 मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपवून आगामी शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे.
- डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र- कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत सर्वच महाविद्यालयांमधील द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची 13 जानेवारी ते 30 जानेवारी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून त्यांची परीक्षा जुलैपर्यंत घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्या परिषदेची आज (बुधवारी) विद्यापीठात बैठक पार पडली. त्यात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी काही दिवसांची सुट्टी देऊन उन्हाळी सुट्टी कमी करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे भविष्यात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आगामी परीक्षा लवकरात लवकर ऑनलाइन पध्दतीने उरकण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या दोन सत्रात किमान 90 दिवसांचा कालावधी जायला हवा, यादृष्टीने परीक्षेचे नियोजन केले जात आहे. मात्र, याच कालावधीत बॅकलॉग विद्यार्थ्यांची मोठी पंचायईत होण्याची शक्‍यता असून त्यावर विद्यापीठ काय मार्ग काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

जानेवारीपर्यंत चालणार प्रवेश प्रक्रिया
कोरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नसून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. अनेक अभ्यासक्रमाच्या सीईटी झाल्या नसल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता यावा, या हेतूने प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत चालू राहिल, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First year students have no summer vacation! Two exams will have to be given in eight months