esakal | पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विजयसिंह देशमुख यांची निवड

बोलून बातमी शोधा

Former Deputy Chairman of Panchayat Samiti Vijay Singh Deshmukh has been elected as the President of Pandharpur Taluka NCP..jpg

विजयसिंह देशमुख हे भगिरथ भालकेंचे कट्टर समर्थक आहेत. अलीकडेच पंढरपूर विधानसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी श्री. देशमुख यांना 
राष्ट्रवादी पक्ष संघटनेत महत्वाचे पद द्यावे, अशी मागणी पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे केली होती.

पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विजयसिंह देशमुख यांची निवड
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांनी श्री.देशमुख यांना निवडीचे पत्र दिले आहे. ऐन विधानसभा पोट निवडणुकीच्या तोंडावर देशमुखांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. 

शहरात पुन्हा वाढताहेत खासगी सावकारकीचे गुन्हे ! व्याजाच्या पैशावरून घर पेटवून देण्याची धमकी

विजयसिंह देशमुख हे भगिरथ भालकेंचे कट्टर समर्थक आहेत. अलीकडेच पंढरपूर विधानसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी श्री. देशमुख यांना 
राष्ट्रवादी पक्ष संघटनेत महत्वाचे पद द्यावे, अशी मागणी पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांनी श्री. देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीनंतर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांच्या निवडीचे स्वागत केले. 

श्री. देशमुख हे मागील अनेक वर्षापासून तालुक्‍याच्या राजकारणात सक्रीय आहेत. दहा वर्ष विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले तर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून अडीच वर्षे जनतेची सेवा केली आहे. विधानसभा निवडणुकीत श्री. देशमुख यांची महत्वाची भूमिका मानली जाते. त्यांच्या कासेगाव येथून त्यांनी भारत भालकेंना विधानसभेला तीन वेळा लिड दिले आहे. त्यानंतर विधानसभा पोट निवडणुकीच्या तोंडावर श्री. देशमुख यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्षपदावर केलेली निवड महत्वपूर्ण मानली जाते. त्यांच्या निवडीनंतर विठ्ठलचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.यावेळी भास्कर मोरे, गोरख ताड,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.