अण्णा भाऊ साठे म्हणजे श्रमिकांचे विश्वविद्यालय : माजी आमदार नरसय्या आडम 

Adam
Adam

सोलापूर (सोलापूर) लाल बावटा कलापथकाचे प्रमुख. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिभेला तोड नव्हती. मराठी साहित्यावर मजबूत पकड होती. त्यांची कल्पनाशक्ती, आकलनशक्ती पाहता माणसाला वास्तववादी बनवणारी होती. एका ठिकाणी लिहिताना अण्णाभाऊ म्हणतात, "भाषांतर ही देखील अत्यंत अवघड कला आहे. वाङ्‌मय म्हणजे भात नव्हे की तो टोपातून ताटात आणि ताटातून पोटात जायला हवा. वाङ्‌मय म्हणजे सुगंध आहे. तो एका फुलातून दुसऱ्या फुलात नेणे जेवढे अवघड आहे तेवढेच भाषांतर करणे अवघड आहे.' सामान्य श्रमिकांच्या कुटुंबात जन्मलेले अण्णा भाऊ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मराठी साहित्यात श्रमिकांचं भावविश्व आणि वास्तव मांडून श्रमिकांचे विश्वविद्यालय ठरले. या महान लोकशाहिराच्या साहित्याचा जागर करणे हेच खरे अभिवादन ठरेल. महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न किताब बहाल करावे, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तथा ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. 

माजी आमदार श्री. आडम, माकपचे जिल्हा सचिव ऍड. एम. एच. शेख यांनी भय्या चौक येथील अण्णा भाऊ साठे व टिळक चौक येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तत्पूर्वी माकपच्या वतीने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार, दाऊद शेख, दीपक निकंबे, बापू साबळे, अनिल वासम, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, सनी शेट्टी, मोहन कोक्कुल, बाबू कोकणे, किशोर मेहता आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. आडम पुढे म्हणाले, 1 ऑगस्ट हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. कारण, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहालमतवादाचा पुरस्कार करून अनेक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी लढण्याची वीजे लोकमान्य टिळक यांनी रुजवली तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफाच्या ताफावर आणि पहाडी आवाजाने अण्णा भाऊ साठे यांनी जीव ओतले. अशी प्रतिभावंत महनीय व्यक्ती सदैव आपणासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करणे व ते विचार नव्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com