
येथील उपअधीक्षक कार्यालयात पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या रेश्मा सुतार या कार्यालयीन कामकाज संपवून साकत पिंपरी येथे स्कूटीवरून घरी जात असताना शेलगावजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून पाठीमागून आल्या आणि स्कूटीला लाथ मारली. यामुळे त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. रस्त्याच्या बाजूला पडल्यानंतर ते म्हणाले की, "कर गुन्हा दाखल, माझ्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल करतेस का, कर' असे म्हणून निघून गेले.
बार्शी (सोलापूर) : शहरातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातून सेवा संपवून साकत पिंपरी येथील स्वतःच्या घरी जात असताना महिला पोलिस कर्मचाऱ्यास बार्शी - तुळजापूर रस्त्यावरील शेलगावजवळ चौघा जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ला प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस रेश्मा सुतार यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना गुरुवारी (ता. 7) सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
येथील उपअधीक्षक कार्यालयात पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या रेश्मा सुतार या कार्यालयीन कामकाज संपवून साकत पिंपरी येथे स्कूटीवरून घरी जात असताना शेलगावजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून पाठीमागून आल्या आणि स्कूटीला लाथ मारली. यामुळे त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. रस्त्याच्या बाजूला पडल्यानंतर ते म्हणाले की, "कर गुन्हा दाखल, माझ्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल करतेस का, कर' असे म्हणून निघून गेले. उठून गाडी उभी करीत असताना पुन्हा दुसरे दोघे दुचाकीवर आले. "आज तू घरापर्यंत कशी पोचते तेच बघतो, तुला मी आज जिवंत ठार मारतो' असे म्हणत धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला; पण रेश्मा पवार यांनी वार चुकविला. रस्त्यावर वाहने येत आहेत असे दिसताच दोघेजण दुचाकी वळवून बार्शीकडे परत गेले.
पतीला फोन केल्यानंतर पतीने रेश्मा सुतार यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रेश्मा सुतार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल