सोलापूर जिल्ह्यातील चार तालुके पाणी प्रश्नासाठी एकवटले 

The four talukas of Solapur district came together for the questioning of water
The four talukas of Solapur district came together for the questioning of water

वाळूज (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील नरखेड येथील क्रांती लॉन्स येथे 'पाणी परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत "सीना-भोगावती जोडकालव्या'च्या प्रश्‍नावर मंथन करण्यात आले. तसेच मोहोळ, माढा, बार्शी व उत्तर सोलापूर या चार तालुक्‍यांच्या जिव्हाळ्याची असलेली ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा निर्धार चार तालुक्‍यांतील लोकप्रतिनिधी व नेत्यांनी केला. 

"सीना-भोगावती जोडकालवा पाणी संघर्ष समिती'च्या वतीने आयोजिलेल्या या "पाणी परिषदे'च्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे होते. या वेळी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, राजन जाधव, पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार, निरंजन भूमकर, प्रकाश चवरे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, वैभव पिसाळ, डॉ. संदेश कादे, सुशांत कादे, मकरंद निंबाळकर, सुहास पाटील, विजय कादे यांच्यासह चारही तालुक्‍यांतील मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आमदार यशवंत माने म्हणाले, मोहोळ, माढा, बार्शी व उत्तर सोलापूर या चार तालुक्‍यांतील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासह 40 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा "सीना-भोगावती जोडकालव्याचा प्रश्‍न' मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करणार असून या प्रस्तावित कामाचे पुन्हा फेर सर्वेक्षण करण्यास शासनास भाग पाडू. 
आमदार बबनराव शिंदे म्हणाले, की भविष्यात पाणीटंचाईपासून बचाव करायचा असेल तर आतापासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा केल्यास इतर काळात पाणीटंचाई भासणार नाही. सीना-भोगावती जोडकालव्याच्या प्रश्‍नासाठी संघर्ष चालू ठेवा, तुमच्या संघर्षाला आमचीही साथ आहे. 

राजन पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारल्याशिवाय सीना-भोगावती जोडकालव्याचा प्रश्‍न मार्गी लागणार नाही. या जोडकालव्याच्या संदर्भात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी सोलापूर दौऱ्यावेळी चर्चा केली व सर्व माहिती दिली असता त्यांनी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले. 
या कार्यक्रमासाठी जगन्नाथ कोल्हाळ, माजी सभापती नागेश साठे, विजयकुमार पोतदार, सुभाष डुरे-पाटील, बाळासाहेब डुरे-पाटील, बालाजी साठे, बालाजी पवार, उपसभापती जितेंद्र शीलवंत, पंडित ढवण, बबन दगडे, विजयकुमार पाटील, रामराजे कदम, विनोद पाटील, राजकुमार पाटील, अमोल कादे, तुकाराम पाटील, संदीप पाटील, अनिल देशमुख, हणमंत पोटरे, विष्णू शेळके, पाटबंधारे विभागाचे श्री. निंबाळकर, दिनकर पाटील, डी. आर. पाटील, रामकृष्ण लोखंडे यांच्यासह मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुशांत कादे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती वाघमारे व गुरुराज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी साठे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com