शहरातील चार हजार 481 पुरुष आतापर्यंत कोरोनाबाधित: आज 46 पॉझिटिव्ह

तात्या लांडगे
Wednesday, 16 September 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 73 हजार 512 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील चार हजार 481 पुरुष कोरोनाबाधित 
  • आज 549 पैकी 46 जणांचे अहवाल निघाले पॉझिटिव्ह 
  • शहरात आतापर्यंत 301 पुरुष आणि 147 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी 
  • आतापर्यंत सहा हजार 407 रुग्णांची कोरोनावर मात: 787 रुग्णांवर उपचार सुरु 

सोलापूर : शहरात आज नव्याने 46 रुग्णांची भर पडली असून आता कोरोना बाधितांची संख्या सात हजार 644 वर पोहचली आहे. त्यामध्ये चार हजार 481 पुरुषांचा तर, तीन हजार 161 महिलांचा समावेश आहे. शहरातील 301 पुरुष आणि 147 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

ठळक बाबी...

  • शहरातील 73 हजार 512 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरातील चार हजार 481 पुरुष कोरोनाबाधित
  • आज 549 पैकी 46 जणांचे अहवाल निघाले पॉझिटिव्ह
  • शहरात आतापर्यंत 301 पुरुष आणि 147 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी
  • आतापर्यंत सहा हजार 407 रुग्णांची कोरोनावर मात: 787 रुग्णांवर उपचार सुरु

 

आज शहरात वैद्यकीय महिला वसतीगृह (होटगी रोड), राजस्व नगर, आदित्य नगर, इंदिरा नगर, राघवेंद्रनगर, जय जलराम नगर (विजयपूर रोड), पूर्व मंगळवार पेठ (कुंभार वेस), मंत्री चंडक विहार, गोंधळे वस्ती (भवानी पेठ), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स, उत्तर कसबा (पत्रा तालिमजवळ), दक्षिण कसबा, केगाव, शिवाजी नगर (बाळे), गुरूदेव दत्त नगर (जुळे सोलापूर), अभिमानश्री नगर, रेल्वे लाईन (जुना एम्प्लॉयमेंट चौक), वैष्णवी पार्क (अक्‍कलकोट रोड), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), सुनिल नगर, भूषण नगर झोपडपट्टी क्र.दोन, शेटे नगर (दमाणी नगर परिसर), रामराज्य नगर आणि ऋषिकेश नगर (दहिटणे) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील दोन हजार 614 संशयित होम क्‍वारंटाईन आहेत. तर 198 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 28 हजार 134 संशयितांपैकी 25 हजार 520 व्यक्‍तींनी होम क्‍वारंटाईनचा तर 11 हजार 882 व्यक्‍तींनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thousand 481 men in the city so far infected with corona: today 46 positive