मोफतचे धान्य रेशन दुकानदारांसाठी डोकेदुखी 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

धान्य वाटपासाठी 2014 मध्ये देण्यात आलेले उद्दिष्ठ अद्यापही तेच आहे. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी आम्ही केली आहे परंतु ही मागणी अद्यापही प्रलंबित आहेत. लॉकडाऊनचा फटका सर्वच कार्डधारकांना बसला आहे. केशरी कार्डधारकांची संख्या मोठी आहे. या कार्डधारकांना मोफत धान्य देता नाही आले तरीही अल्प दरात धान्य द्यायला हवे होते. 
- सुनील पेंटर, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना 

सोलापूर : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमध्ये कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रती माणसी पाच किलो मोफत तांदूळ तीन महिने देण्याची घोषणा झाली. या घोषणेतून केशरी कार्डधारक वगळल्याने ज्यांना पूर्वी लाभ मिळत आहे त्यांनाच मोफत धान्य आणि ज्यांना लाभ मिळत नाही ते पुन्हा वंचित अशीच स्थिती निर्माण झाली आहे. आम्हाला धान्य काय नाही? असा जाब विचारण्यासाठी लॉकडाऊन मोडून लोक घोळक्‍याने रेशन दुकानात येऊ लागल्याने दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/bjp-helps-prevent-corona-276698">हेही वाचा - भाजपकडून कोरोना प्रतिबंधासाठी मदत 
सोलापूर शहरात 314 रेशन दुकाने असून या सर्वांनी ही समस्या भेडसावू लागली आहे. अंत्योदय योजनेतील 6 हजार 49 तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 90 हजार 133 अशा एकूण 96 हजार 182 कार्डधारकांनाच नियमित धान्य मिळत आहे. याच कार्डधारकांना आता पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीएचमधील 1 लाख 65 हजार 513 केशरी कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. आम्हाला धान्य का देत नाही? म्हणून सोलापुरातील शिवगंगानगर, गांधीनगर, जेलरोड पोलिस ठाणे या परिसरातील कार्डधारकांनी समूहाने एकत्रित येत दुकानदारांकडे विचारणा करण्यास सुरवात केली आहे. नियमित धान्य वाटपातील धान्य आल्याने हे वाटप सुरू आहे. मोफतचा तांदूळ अद्यापही रेशन दुकानात आलेला नाही. आम्हाला मोफतचा तांदूळ द्या यासाठी कार्डधारक दुकानांमध्ये येऊ लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free grain ration headaches for shoppers