खेड्यातल्या महिलांनी घरबसल्या शिवलेले गणवेश जाणार जगभर

खेड्यातल्या महिलांनी घरबसल्या शिवलेले गणवेश जाणार जगभर
Updated on

सोलापूर ः कारंब्यातील महिलांना घरबसल्या शालेय गणवेश, टाय, बेल्ट यासारखे कपडे शिलाई करण्याचा रोजगार मिळाला आहे. आपल्यातील कार्यकुशलतेच्या जोरावर महिला नक्कीच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार काम करतील. हे गणवेश स्थानिकच नव्हे तर जगभरातील मार्केटमध्ये जातील, असा विश्‍वास माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. 

कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे सोलापूर सोशल फाउंडेशन आणि कमल लघु उद्योगाच्या पुढाकाराने आणि कारंबा ग्रामपंचायतीच्या सहाय्याने महिलांना घरच्या घरी रोजगार देणाऱ्या गारमेंट प्रकल्पाचे उद्‌घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कौशल्या सुतार होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, असोसिएट गारमेंट क्‍लस्टरचे अध्यक्ष जितेंद्र डाकलिया, सहसचिव प्रकाश पवार, संचालक अमित जैन, कमल उद्योगाचे जयसिंग पवार, प्रा. विनायक सुतार उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, महिलांमध्ये मुळातच अंगभूत कौशल्य असते. विशेषतः कामाच्याप्रती निष्ठा आणि त्याग अधिक असतो. आपल्या घराला आपला आर्थिक हातभार लागावा, यासाठीच त्यांची ही धडपड असते. याच धडपडीला बळ देण्याचे काम हा प्रकल्प करेल. पण आजचे जग मार्केटिंग आणि ब्रॅंडीगचे आहे. त्यासाठी आपली, आपल्या गावाची ओळख वाढवा. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हवी ती मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. डाकलिया यांनी भविष्यात कारंब्यासह परिसरातील गावातील महिलांनाही सामावून घेऊ, असे आश्‍वासन दिले. प्रास्ताविकात विनायक सुतार यांनी या उद्योगामागचा उद्देश सांगितला. यावेळी माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब गुंड, विश्‍वनाथ जगताप, ग्रामपंचायत सदस्य इन्नुस शेख, श्रीकांत आदाटे, अशोक बहिर्जे, स्मिता पाटील, लक्ष्मी बहिर्जे, कविता भोरे, भागवत कत्ते, महेश पेंडपाले, संजय आदाटे, आनंद सुतार, शशिकांत दुधाळ, अकबर पटेल, सत्तारभाई शेख उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com