गणेशभक्तांनी उंबरठ्यावर दिला गणपतीबाप्पांना निरोप 

ganesh visarjan.jpg
ganesh visarjan.jpg
Updated on

अकलूज(सोलापूर) : अकलूज परिसरातील गणेश भक्तांनी घरातच गणेश पूजन करून दारी आलेल्या ग्रामपंचायतीच्या वाहनाकडे गणेश मूर्ती दिली तर ग्रामपंचायतीनेही गणेशभक्तांच्या भावनेचा आदर करीत नीरा नदीच्याकाठी सुमारे तीन हजार पेक्षा जास्त मूर्तींचे विधिवत पूजन व आरती करून विसर्जन केले. 

दरवर्षी अकलूजकर आपल्या घरगुती गणेशाच्या विसर्जनासाठी सकाळपासून पारंपरिक वाद्यांसह गुलालाची मुक्त उधळन करीत निरा नदीकाठिल घाटांवर येत असतात. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दुपारी 4.00 ला भव्यदिव्य मिरवणूक काढली जाते.अतिशय उत्साही वातावणातील या मिरवणूकीत ढोलताशा, झांजपथक, गजीढोल, लेझिम, पारंपारिक वाद्य आदिं सह गुलालाची मुक्त उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी असते. या मिरवणुकीतील शिस्त, पारंपरिक वाद्यांचा समावेश रोषणाई आरास आदींचे परीक्षण केले जाऊन ग्रामपंचायतीच्या वतीने विविध बक्षिसे दिली जातात. 

मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामीण समितीने नागरिकांच्या घरूनच गणेशमुर्ती घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामीण समितीचे अध्यक्ष व सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या आवाहनास अकलूजकरांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. अकलूज ग्रामपंचायतीने प्रत्येक वार्डात एक गाडी व पाच कर्मचारी यांची नेमणूक केली. अकलूजकरांनी घरगुती गणेशमुर्तीं तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेशमूर्त्या विधीवत पूजन करून दारातूनच कर्मचाऱ्यांकडे सोपविल्या सांयकाळपर्यंत जमलेल्या सुमारे 3000 पेक्षा जास्त मूर्त्यांचे नीरा नदीकाठावरील घाटावर एकत्रीत पूजन करून विसर्जन करण्यात आले. 
गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी स्वतः दरवर्षी गणेश अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन आणि मित्र सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी असलेल्या घाटांवर होत असते. सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनामुळे प्रथमच कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात आली नाही. 

संपादन : प्रकाश सनपूरकर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Rain
Solapur Cyber Fraud
radhakrishna vikhe patil and ranjitsinh shinde
Pune Teachers Constituency
Marathi News Esakal
www.esakal.com