मी माझ्या वडिलांमुळे घडलो : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव 

पांडुरंग भगत 
Wednesday, 2 September 2020

मी दिव्यांग असताना मला जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे व पूर्णतः सहकार्य करणारे माझे वडील आहेत. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होण्यामागे मला प्रेरित करणारे माझे वडील आहेत व मी माझ्या वडिलांमुळे घडलो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव यांनी केले.

कंदर (सोलापूर) : नुकताच अर्जुन पुरस्कार पटकावलेले आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव यांचा सत्कार कविटगाव, पांगरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मच्छिंद्र नुस्ते विद्यालय, कविटगाव येथे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना सुयश जाधव म्हणाले, मी दिव्यांग असताना मला जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे व पूर्णतः सहकार्य करणारे माझे वडील आहेत. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होण्यामागे मला प्रेरित करणारे माझे वडील आहेत व मी माझ्या वडिलांमुळे घडलो. 

हेही वाचा : "मघा आणि ढगाकडे बघा' अशी झाली मोहोळ तालुक्‍याची परिस्थिती ! 

या वेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजी बंडगर, करमाळा सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, ज्ञानेश पवार आदींनी अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल सुयश जाधव यांचे अभिनंदन केले. 

हेही वाचा : ब्रेकिंग ! जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप माने यांचे नाव निश्‍चित

घराघरात एक मुलगा देशाचं नाव उंचावर नेणारा असावा. आपल्या मुलांवर चांगले संस्कार द्या. सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सुयश जाधव यांना यश लाभो, अशा शुभेच्छा जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिल्या. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे, अजित तळेकर, मच्छिंद्र नुस्ते, विद्यालयाचे अध्यक्ष मच्छिंद्र नुस्ते, ज्ञानेश पवार, सत्कारमूर्ती सुयश जाधव, नारायण जाधव, सोलापूर जिल्हा इंग्रजी शाळा संघटनेचे अध्यक्ष संदीपान गुटाळ आदी उपस्थित होते. विनोद गरड यांनी सूत्रसंचालन केले. संतोष नुस्ते यांनी प्रास्ताविक केले. भरत चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी सरडे, यशवंत तिवारी व मुद्दस जहागीरदार यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International swimmer Suyash Jadhav was felicitated by Kavitgaon villagers