Gram Panchayat Election : भैरववाडी-मनगोळी ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध निवडीपासून फक्त एक पाऊल मागे

Gatgram Panchayat consists of Bhairavwadi and Mangoli villages of Narkhed Mandal.
Gatgram Panchayat consists of Bhairavwadi and Mangoli villages of Narkhed Mandal.
Updated on

वाळूज (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍याच्या उत्तर सीमेवरील नरखेड मंडळातील भैरववाडी या दोन गावांची मिळून असलेली गटग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यापासून मनगोळी गावातील राजकारणामुळे फक्त एक पाऊल मागे आहे. 

मोहोळ तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये नरखेड मंडळातील भैरववाडी व मनगोळी या दोन गावांची मिळून असलेल्या गटग्रामपंचायतीचा समावेश आहे. या दोन्ही गावांची मिळून एकूण मतदार संख्या 713 आहे. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या सात आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भैरववाडी गावामधून पाच तर मनगोळी गावामधून सहा असे एकूण 11 अर्ज दाखल झाले आहे.

निवडणूक बिनविरोध व्हावी, दोन्ही गावांचा विकास व्हावा. यासाठी भैरववाडी गावातील नागरिकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले. बैठक घेऊन भैरववाडी गावातील 5 जागांसाठी फक्त पाचच अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे या गावातील पाचही उमेदवार हे नवीन आहेत. यामध्ये ज्या घरातील व्यक्तीने आतापर्यंत एकदाही ग्रामपंचायतीचे कोणतेही पद भोगले नाही, अशानांच उमेदवारी देण्यात आली आहे. 

मात्र मनगोळी गावातील राहिलेल्या दोन जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने ही गट ग्रामपंचायत बिनविरोध होण्यापासून फक्त एक पाऊल मागे राहिली आहे. भैरववाडी नागरिकांकडून मनगोळी गावातील राजकारणामुळे भैरववाडी-मनगोळी गट ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास अडचण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मनगोळी गावातील नागरिकांनी दोनच उमेदवार बिनविरोध निवडून दिल्यास मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी जाहीर केलेल्या 21 लाख रूपयांचा निधी मिळण्यास पात्र ठरणार आहे.

यासाठी मनगोळी गावातील नागरिकांनी एकत्र येवून बिनविरोधचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भैरववाडी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज काढून घेण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे मनगोळी गावातील दोन जागांसाठी निवडणूक होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भैरववाडी-मनगोळी गटग्रामपंचायत मतदार संख्या पुढील प्रमाणे 

प्रभाग क्रमांक पुरुष स्त्रिया एकूण 
प्रभाग 1 - 119 119 238 

प्रभाग 2 - 148 132 280 

प्रभाग 3 - 105 90 195 

एकूण मतदारांची संख्या 713

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com