काय आहे जिओ टॅगिंग बेस्ड हजेरी प्रणाली जी "या' कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार? 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 20 जून 2020

महापालिकेकडील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याकरिता जिओ टॅगिंग बेस्ड हजेरी प्रणाली सिस्टीम सुरू केली आहे. या प्रणालीमध्ये छायाचित्राद्वारे हजेरी नोंद करण्यात येते. यामध्ये छायाचित्राबरोबर रेखांश आणि अक्षांश तारीख, वेळ हे सर्व उपलब्ध होतात. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहणे हे बंधनकारक आहे. जे कर्मचारी वेळेत कामावर उपस्थित राहणार नाहीत अशा सेवकांचे लेट मार्क पकडले जाईल व जे कर्मचारी हे न सांगता, पूर्वपरवानगी शिवाय गैरहजर राहतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

सोलापूर : महापालिकेकडील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याकरिता जिओ टॅगिंग बेस्ड हजेरी प्रणाली सिस्टीम सुरू केली आहे. या प्रणालीमध्ये छायाचित्राद्वारे हजेरी नोंद करण्यात येते. यामध्ये छायाचित्राबरोबर रेखांश आणि अक्षांश तारीख, वेळ हे सर्व उपलब्ध होतात. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहणे हे बंधनकारक आहे. जे कर्मचारी वेळेत कामावर उपस्थित राहणार नाहीत अशा सेवकांचे लेट मार्क पकडले जाईल व जे कर्मचारी हे न सांगता, पूर्वपरवानगी शिवाय गैरहजर राहतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 

हेही वाचा : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी द्या "या' व्यवसायाला परवानगी 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आज जुना सभागृह येथे महापालिकेचे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांची आढावा बैठक आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतली. या वेळी उपायुक्त अजयसिंह पवार यांनी स्वच्छ भारतच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलन केंद्र, घंटागाडी, शहरातील सार्वजनिक शौचालये आणि आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून कुठली कामे केली जातात याची माहिती दिली. शहरातील विविध भागांतील समस्यांबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा : लॉकडाउननंतर दुकाने सुरू, तरी "हे' का आहेत बेरोजगार? 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, फळ व भाजी विक्रेत्यांनी मास्क व हॅंडग्लोव्ह्‌जचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्ती अथवा बाजारपेठ येथे फिरणाऱ्या व्यक्ती किंवा दुकानदार जर मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज वापरत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सिगारेट ओढणाऱ्या व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर त्वरित दंड आकारण्यात यावा. जर त्या व्यक्तीने दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीकडून नियमानुसार एक दिवस सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक काम करून घ्यावे, असे आदेश केंद्र सरकारने याआधी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी त्वरित करावी. तसेच शहरातील बाजारपेठेमध्ये जी व्यक्ती कॅशलेसचा वापर करत नाही अशा दुकानींवर कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. 
या वेळी उपायुक्त श्री. पवार, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Geo-tagging based attendance system in Solapur Municipal Corporation to discipline employees