लॉकडाउननंतर दुकाने सुरू, तरी "हे' का आहेत बेरोजगार? 

Tailor
Tailor
Updated on

सोलापूर : टेलर व्यावसायिकांची मदार ही दरवर्षीच्या लग्नसराई व महत्त्वाच्या मोठ्या सणांवर असते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच महिने सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे टेलर व्यवसायाला खूप मोठा फटका बसला असून, हा व्यवसाय आता तीन वर्षे मागे पडल्याची चिंता टेलर व्यावसायिकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. आता लॉकडाउननंतर टेलर दुकाने सुरू झाली आहेत, मात्र 15 दिवसांनीही ग्राहकांविना व्यावसायिक व कामगार बेरोजगारच असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यावर्षी व्यवसाय चांगला होईल, अशी आशा होती; मात्र कोरोनामुळे टेलर व्यावसायिकांचा मोठा सीझन असलेली लग्नसराई, आंबेडकर जयंती व रमजान ईद असे महत्त्वाचे सण लॉकडाउनमुळे हातचे गेले. दोन महिन्यात मोठ्या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर छोट्या दुकानदारांचे ठरलेले ग्राहक फिरकलेच नाहीत. आता लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर 5 जूनपासून टेलर व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू केली आहेत. मात्र ना सण आहे ना सीझन, त्यामुळे कामगारांनाही काम नाही. लॉकडाउननंतर काही ठरलेले विवाह होत आहेत, मात्र वधू-वरांचेच कपडे शिवायला येत असल्याने तेवढाच 20 टक्के व्यवसाय होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. आता टेलर व्यावसायिक व कामगारांना पुढील दिवाळी, लग्न सराईवर भिस्त ठेवावी लागणार आहे. छोट्या टेलर व्यावसायिकांची तर खूपच बिकट अवस्था झाली आहे. सीझन असताना ठरलेल्या ग्राहकांवर हे दुकानदार अवलंबून असतात. मात्र सर्व सण हातातून गेल्याने व आता लॉकडाउननंतर कोणी ग्राहक फिरकत नसल्याने त्यांच्यावर खूपच बिकट परिस्थिती ओढवली आहे. कामगार व मालक घरचेच असल्याने त्यांना दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे. 

लॉकडाउननंतर आम्ही प्रशासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून, सुरक्षा साधनांचा वापर करून टेलर दुकान सुरू केले आहे. मात्र ग्राहकांविना आमच्यासह कामगार बसून आहेत. केवळ 20 ते 25 टक्के व्यवसाय होत आहे. अशा परिस्थितीतही कामगारांना पगार द्यावा लागत आहे. 
- श्‍यामसुंदर विडप,
टेलर व्यावसायिक 

आमचे दुकान दोन-तीन मशिनचे आहे. लग्नसराई असो वा मोठे सण, ठरलेले ग्राहक येणारच याची खात्री असते. आंबेडकर जयंती व रमजान ईद लॉकडाउनमध्ये गेल्याने एकही ग्राहक आला नाही. आता दुकान उघडले तरी ग्राहक नाही. दिवाळीपर्यंत वाट बघू मात्र तोपर्यंत कोरोना आटोक्‍यात यायला हवा. 
- बाबू यल्लाराम,
टेलर व्यावसायिक 

लॉकडाउनमुळे खूप मोठ्या प्रमाणात आमचा रोजगार बुडाला. आता लॉकडाउननंतर दुकाने सुरू झाली तरी ग्राहक फिरकत नाहीत. आठवड्यात दोन ते अडीच हजार रुपयांचे काम होत होते आता 700 ते 800 रुपयांचेच काम होत आहे. दिवाळीपर्यंत सीझनची वाट पाहावी लागणार आहे, तोपर्यंत उपासमार होणार आहे. 
- हिरालाल क्‍यातारी,
टेलर कामगार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
Marathi News Esakal
www.esakal.com