मोहोळच्या बाजारात विक्रीसाठी राजस्थानी शेळ्या दाखल 

चंद्रकांत देवकते
Sunday, 25 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या प्रदिर्घ कालावधीनंतर भरलेल्या जनावरांच्या आठवडा बाजारात शेळ्या मेढ्यांची खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने आवक झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावर्षी पडलेला चांगला पाऊस तसेच अधिक महिना व नवरात्रीच्या उपवासानंतर शेळ्या मेढ्यांच्या मांसाची वाढती मागणी लक्षात घेता जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या गावरान व उस्मानाबादी शेळ्याबरोबर शरीराने वजनदार व लांब कान असलेल्या राजस्थानमधील कोटा जातीच्या शेळ्या या बाजारामध्ये विक्रीस आणल्या होत्या. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यासह जनावरे विकत घेणाऱ्या व्यापारी दुकानदारांनी अधिक पसंती कोटा राजस्थानी बकऱ्याला दिली. 

मोहोळ(सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावरांच्या बाजारामध्ये शेळ्याच्या विविध जातीपैकी राजस्थानमधील कोटा, सोजत, शिरोळे, पंजाबमधील बिटल यांच्यासह उस्मानबादी, गावरान शेळ्या विक्रीसाठी आल्याने या शेळ्या खरेदी करण्यासाठी हौशी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

हेही वाचाः पावसाने नुकसान झाल्यानंतर आवकी कमी झाल्याने वाढले झेंडुचे दर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या प्रदिर्घ कालावधीनंतर भरलेल्या जनावरांच्या आठवडा बाजारात शेळ्या मेढ्यांची खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने आवक झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावर्षी पडलेला चांगला पाऊस तसेच अधिक महिना व नवरात्रीच्या उपवासानंतर शेळ्या मेढ्यांच्या मांसाची वाढती मागणी लक्षात घेता जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या गावरान व उस्मानाबादी शेळ्याबरोबर शरीराने वजनदार व लांब कान असलेल्या राजस्थानमधील कोटा जातीच्या शेळ्या या बाजारामध्ये विक्रीस आणल्या होत्या. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यासह जनावरे विकत घेणाऱ्या व्यापारी दुकानदारांनी अधिक पसंती कोटा राजस्थानी बकऱ्याला दिली. 

हेही वाचाः शाळा सोडलेला मुलगा झाला मेजर, दुसरा मॅनेजर शिक्षिका वैशाली डोंबाळे यांनी दिला मदतीचा हात 

येथील जनावरांचा बाजारामध्ये जास्तीत जास्त जनावरे खरेदी विक्रीस यावी, यासाठी चांगल्या सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अस्लम चौधरी, उपसभापती दत्तात्रय पवार, सचिव सचीन पाटील, लिपीक सुग्रीव गुंड, कर्मचारी मल्हारी माने, लतीफ पठाण करत आहेत. 

वजनाच्या आधारे शेळ्यांची विक्री 
इतर शेळ्याच्या तुलनेत राजस्थानी कोटा शेळ्यांचे वजन समान वयामध्ये किमान पाच किलो अधिक असते. या शेळ्यांचे दूध अधिक चविष्ठ व आरोग्यास लाभदायक आहे. तर या कोटा शेळ्यांची विक्री नगावर होत नसून वजनावर होते. चारशे रुपयापासून सहाशे रुपये प्रती किलोप्रमाणे या शेळ्यांची विक्री होते. 
- बिरूदेव माने, जनावरांचे व्यापारी  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goats in Rajasthan for sale in Mohol market