कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याला येणार पुन्हा सुवर्णकाळ : 511 अधिकारी व कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती 

kurduvadi.jpg
kurduvadi.jpg

कुर्डुवाडी(सोलापूर) : कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यात अभियंता, अधिकारी, तांत्रीक कर्मचारी अशा 511 जणांची नियुक्ती होणार असल्याची माहिती कारखाना उपमुख्य यांत्रिक अभियंता संजय साळवे यांनी दिली. 

कारखान्यात प्रथमच एकावेळी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नियुक्ती होत असल्याने कारखान्याचा सुवर्णकाळ परत येत असुन याचा कुर्डुवाडी बाजारपेठेच्या भरभराटीला फायदा होणार आहे. 

कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यात सध्या अभियंता, कार्यालयीन कर्मचारी, तांत्रीक कर्मचारी असे एकूण 310 जण कार्यरत आहेत. पुर्वी येथे नॅरोगेजचे काम मोठ्या प्रमाणात होत असे. परंतु बदलत्या काळात नॅरोगेजचे काम कमी झाले. कर्मचा-यांची संख्या कमी होउ लागली. या काळात सामाजिक, राजकीय, कर्मचारी संघटना, कारखाना अधिकारी यांनी या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर काम मिळावे यासाठी प्रयत्न केले. कुर्डुवाडी रेल्वेकारखान्याकडून उपमुख्य यांत्रिक अभियंता संजय साळवे यांचा सततचा पाठपुरावा, मुख्य प्रधान यांत्रिक अभियंता ए के गुप्ता, मुख्य कारखाना अभियंता बी. एम. अग्रवाल व परेल रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक विवेक आचार्य यांच्या सहकार्याने या कारखान्यासाठी येत्या दोन महिन्यात 511 लोकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये 29 कार्यालयीन कर्मचारी व 482 अभियंते, पर्यवेक्षक व तांत्रिक कर्मचा-यांचा समावेश आहे. 
ही भरती करण्याची पद्धती रेल्वे विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे. सध्या या कारखान्यातील कुशल कामगार करत असलेले दरमहिना पीओएचचे असलेले काम वाढुन 120 वॅगन पीओएच पर्यंत होणार आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात फक्त काही दिवस कारखान्यातील काम बंद होते. परंतु लगेच विविध कामगार संघटनांच्या व असोसिएशन कर्मचारी यांच्या सहकार्यातुन सर्व नियम पाळून पीओएच कोचेसचे काम चालू ठेवले होते. कारखान्यात सुरु असलेल्या नुतनीकरण कामात तीन शेड प्रगतूपथावर आहेत. यासाठी सन 2019-20 ला 32 कोटी मिळाले तर यावर्षी 28 कोटी उपलब्ध झाले असल्याचे श्री साळवे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ अभियंता उमेश कुंभार, सहायक प्रबंधक सुनिल कुमार, तमन्ना मुबुखाने, अशोक पाटोळे, स्वप्निल शहाणे, रेल कामगार सेनेचे वाहीद शेख, श्रीकांत भांबुरे, प्रशांत भंडारकवठेकर, किर्तीप्रकाश उत्पर्य आदी उपस्थित होते. 


कोचेसची होणार निर्मिती 
कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यात मालवाहतुक डब्याचे पीओएच( पिरियोडिक ओव्हरहौल), नेरळ-माथेरान, ग्वाल्हेर, ढोलपूर येथे लागणारे विशेष कोच निर्मिती, पुर्ण पारदर्शी असलेले वेस्टाडोम कोचेस निर्मिती केली जाते. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com