खुषखबर... पंढरपुरातील दुकाने उघडणार...

 Good news ... shops in Pandharpur will open ...
Good news ... shops in Pandharpur will open ...

पंढरपूर ः पंढरपूर पालिकेने शहरातील दुकानांवर ए,बी, सी आणि डी अशा पद्धतीने मार्किंग केले आहे. ए आणि सी मार्किंग केलेली दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तर बी आणि डी मार्क केलेली दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडावीत. दर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात यावा असा निर्णय नगराध्यक्षा साधना भोसले आज सकाळी जाहीर केला आहे. 

पंढरपूर नगरपालिकेत काही दिवसांपूर्वी शहरातील व्यापारी पदाधिकाऱ्यांची आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन 17 मे पर्यंत शहरातील सर्व दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन आमदार श्री. परिचारक यांनी या बैठकीत केले होते. उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत 17 मेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

दरम्यान आज 18 मे पासून कोणकोणती दुकाने उघडायची याचा निर्णय झाला नव्हता. नगरपालिकेने शहरातील सर्व दुकानांवर ए, बी, सी आणि डी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले होते. शहरातील सर्व दुकाने एकाच वेळी उघडली तर नागरिकांची गर्दी होईल हे लक्षात घेऊन काही दुकाने आठवड्यातून तीन दिवस आणि उर्वरित दुकाने अन्य तीन दिवस उघडी ठेवावीत यादृष्टीने पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. परंतु त्याचा निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता. 

कोरोना सारख्या महामारीच्या काळात राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज असताना परिचारक आणि भालके गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. 

आमदार भारत भालके यांना विश्वासात न घेता नगरपालिकेने परस्पर काही निर्णय घेतले होते. त्यामुळे आमदार श्री. भालके यांनी या निर्णयांना विरोध दर्शवला होता. नगरपालिकेकडून पास वाटप करताना तसेच ए ,बी ,सी ,डी मार्किंग करताना वशिलेबाजी केली आहे असा आरोप आमदार श्री. भालके यांनी केला होता. 

काल नगराध्यक्ष साधना भोसले उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरूदास अभ्यंकर यांनी संयुक्त पत्रक काढून आमदार श्री. भालके यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले होते परंतु शहरातील कोणती दुकाने कधी सुरू करावयाची याचा मात्र निर्णय जाहीर केला नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आमदार भालके आणि आमदार परिचारक या दोघांच्या राजकारणात विनाकारण शहरातील व्यापारी भरडला जात आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी मधून व्यक्त होऊ लागल्या होत्या. 

आज सकाळी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी शहरातील कोणती दुकाने कधी उघडी ठेवायची याविषयीचा निर्णय जाहीर केला. आवश्‍यक सेवांची दुकाने दररोज सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत उघडली जावीत. अन्य दुकाने नियोजनानुसार ठरलेल्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळात दुकाने सुरू ठेवावीत. सोशल डिस्टन्स आणि अन्य अटी लक्षात घेऊन व्यापार करावा. अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

पान दुकाने, कुंकू बुक्का व प्रसादिक दुकाने, भेळ व चायनीज गाढे आणि दुकाने, हॉटेल, सलून, वाईन शॉप, बियर बार आणि शासनाने निर्बंध घातलेली दुकाने मात्र बंदच ठेवली जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com