कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा "या' उत्सवात आला पहिल्यांदाच साधेपणा 

Akkalkot
Akkalkot

अक्कलकोट (सोलापूर) : कोरोनाच्या संकटामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना 33 वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव न्यासाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साधेपणाचे साजरा करण्यात आला. या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, डॉ. प्रशांत प्रधान (ठाणे), नगरसेवक मीलन कल्याणशेट्टी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍यामराव मोरे हे उपस्थित होते. 

दरम्यान, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व डॉ. प्रशांत प्रधान यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसाद गृहातील "श्रीं'ची आरती संपन्न झाली. मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी व सोमनाथ कुलकर्णी यांनी विधिवत पूजा केली. देश-विदेशात अन्नदान सेवेत अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यंदाचा 33वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संपन्न होणारे धर्मसंकीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोना राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आले. सालाबादप्रमाणे न्यासाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून यंदाच्या वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त 10 दिवसांच्या धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करण्यात आलेली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम रद्द करून कोरोना विषाणूचा संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी साध्या पद्धतीने वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता "श्रीं'ची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, न्यासाचे स्वामी भक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून थांबले आहे. या महामारीमुळे अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित आहे. या कोव्हिड-19 ला हरविण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय साधनसामग्री, स्वच्छतेसाठी लागणारे साधनसामग्री आदींची मदत हे न्यास सातत्याने करीत आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटाझरचे वाटप करण्यात येत आहे. गरजू, गरीब, निराधार व परप्रांतीयांना मोफत अन्नदान करीत आहे. कोरोना विषाणूसंदर्भात न्यासाच्या वतीने विलगीकरण कक्ष सुरू करून चांगली व्यवस्था केली व त्याचप्रमाणे शहर व खेडेगावांत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्यात येत आहे. 

हा कार्यक्रम कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी विश्वस्त लक्ष्मण पाटील, अशोक किणीकर, संतोष भोसले, कृषिरत्न अप्पासाहेब पाटील, अरविंद शिंदे, अभिनंदन गांधी, विशाल दोशी, अक्कलकोट शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम, युवक अध्यक्ष सनी सोनटक्के, श्री. व सौ. मोहन तावरे, मयूर तावरे, धनंजय गाढवे, राजकुमार झिंगाडे, महेश मुळे, प्रवीण देशमुख, प्रवीण घाटगे, सत्तारभाई शेख, मोहसीन मौलवी, बाळासाहेब घाटगे, प्रहार संघटनेचे विजय माने, दयानंद बिडवे, राजशेखर भरडे, अंकुश केत, प्रसन्न हत्ते, ओंकार भीमपुरे, राजाभाऊ नवले, संजय गोंडाळ, गणेश भोसले, महांतेश स्वामी, संभाजी पवार, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, अमित थोरात, सिद्धाराम कल्याणी, सिद्धेश विभूते, मुन्ना कोल्हे, गोरख माळी, विजय पवार, लाला दणके, सतीश दणके, बिरप्पा व्हनझेंडे, दिनेश बंडगर, सौरभ मोरे, प्रसन्न हत्ते, बालाजी कटारे, स्वामिनाथ बाबर, सोमशेखर जमशेट्टी, सतीश महिंद्रकर, विकास पवार, राहुल इंडे, सुनील पवार, सागर पवार, तानाजी सूर्यवंशी, पिंटू सूर्यवंशी, अनिल बिराजदार, अप्पी बिराजदार, प्रसाद हुल्ले आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com