naral.jpg
naral.jpg

नारळ किराणा दुकानातून झाला गायब 

केतूर (सोलापूर)ः कोरोना महामारीच्या संकटामुळे धार्मिक कार्यक्रम तसेच मंदिरे बंद असल्याने सध्या नारळाला मागणी नाही. ग्रामीण भागातील किराणा दुकानातून सध्यातरी नारळ गायब झाला आहे. 

यावर्षी जत्रा, यात्रा, जागरण, गोंधळ, लग्न समारंभ लॉकडाउनमूळे झाले नाहीत. तसेच इतर प्रकारचे सर्वच धार्मिक कार्यक्रम व सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाच्या संसर्गामुळे बंद आहेत. या कार्यक्रमांमध्ये नारळाला मोठी मागणी असते. परंतु लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने अशा सर्वच कार्यक्रमांना ब्रेक बसला आहे. लाॅकडाउनमूळे मंदिरे ही देखील कुलूपबंद झाली आहेत. 

त्यामुळे नारळाला मागणी अत्यंत कमी झाली आहे. सध्याचा आषाढ महिन्यात ग्रामीण भागातील धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. पण याही महिन्यात नारळाला मागणी कमीच आहे. आता श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम असतात. पण त्याही कार्यक्रमावर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यामुळे सध्या नारळाचे भाव दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाले आहेत. 

कमी दराने विक्री 
सध्या नारळाला मागणीच नसल्याने त्याचे दर उतरले आहेत. लॉकडाउन पूर्वी 25 ते 30 रुपयांना विकला जाणारा नारळ सध्या 15 ते 20 रुपयांना विकावा लागत आहे. 
- सुहास निसळ,किराणा व्यापारी,केतूर. 

आवक  निम्म्यावर आली 
धार्मिक कार्यक्रमाबरोबरच हॉटेल व्यवसाय ही बंद असल्याने नारळाला मागणी कमी आहे. त्यामुळे त्याचे दर कमी झाले आहेत. सध्या खोबऱ्याचे दरही उतरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक निम्म्यावरच आली आहे. 
- मारुती जाधव,नारळ व्यापारी,करमाळा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com