"ते" ज्या शाळेत शिकले तेथेच शिक्षक व मुख्याध्यापक होण्याचा मिळवला मान 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 26 जून 2020

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत नागेश खेडकर यांनी माढयात शिक्षण घेतले. माढयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. 1983 ते 1989 साली नागेश खेडकर यांनी 5 वी ते 10 वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण माढयातील जिल्हा परिषद प्रशालेत पूर्ण केले.

माढा(सोलापूर): माढयातील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षण घेतलेले नागेश नरसिंह खेडकर हे याच प्रशालेत 27 वर्षे शिक्षक म्हणून काम केले आणि आता याच प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून ते रूजू झाले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या वाट्याला असा बहुमान फार क्वचित येतो. नागेश खेडकरांनी या संधीतूनच शेकडो विद्यार्थ्यांना विवीध क्षेत्रात यशस्वी करून दाखवले आहे. 

हेही वाचाः करटोली भाजीला शक्तिशाली भाजी का म्हणतात हे माहित आहे काय? 

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत नागेश खेडकर यांनी माढयात शिक्षण घेतले. माढयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. 1983 ते 1989 साली नागेश खेडकर यांनी 5 वी ते 10 वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण माढयातील जिल्हा परिषद प्रशालेत पूर्ण केले. दहावीनंतर डी. एड. केले. त्यानंतर ज्या शाळेत ते शिकले त्याच शाळेत 1993 मध्ये ते सहशिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांनतर बी.ए., एम.ए्‌. व बी.ए्‌ड. चे शिक्षण त्यांनी घेतले. दरम्यान ज्ञानार्जनाचे काम करत करत त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही चालू ठेवला. याचा उपयोग त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप, नवोदय विद्यालय, प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) यासारख्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करताना झाला. 

हेही वाचा ः उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल.... 

श्नी. खेडकर यांनी पुढाकार घेतल्याने अशा परीक्षांमध्ये तीनेशहून अधिक विद्यार्थी चमकले आहेत. एन.एम.एम.एस. च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. श्नी.खेडकर हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. अनेकजण अधिकारी होतात. मोठया हुद्दयावर नोकरी करतात. राजकीय व इतर क्षेत्रात कमालीचे यशस्वी होतात. अशा सर्वांनाच आपल्या शालेय जीवनाचे व शाळेचे, शाळेतील मित्रांचे कायमच आकर्षण असते. योगायोगाने श्नी. खेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचे मुख्याध्यापक होण्याचा मान मिळाला आहे. तुम जिस स्कूल पढते हो उसी स्कूल के हम हेड मास्टर हैं असे डायलॉग आपण चित्रपटात ऐकतो. पण हम जिस स्कूल मे पढे, वही स्कूल के हम हेड मास्टर भी हैं हा असा काहीसा योगायोग श्नी. खेडकर यांच्याबाबतीत आला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He got the honor of being a teacher and headmaster in the same school where he studied