#Solapur : बाहेर पडू नका... किराणा, भाजीपाला, औषध मिळेल घरपोच! 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 एप्रिल 2020

नागरिकांनी आपल्या घराजवळील किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेत्याकडून माल घ्यावा किंवा आपल्या गरजेनुसार ऑनलाइन मागणी करावी. संचारबंदीच्या काळात होम डिलिव्हरीची सुविधा उत्तम आहे. आपला परिसर सोडून इतर ठिकाणी वाहनावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. भाजी विक्रेत्याकडून परत जाताना रिकाम्या हाताने जाणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. अत्यावश्‍यक सेवेतील लोकांनी तसेच शासकीय कार्यालयातील पाच टक्के कर्मचारी वर्गाने आपली ओळखपत्रे सोबत ठेवावीत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 

सोलापूर : संचारबंदीच्या काळात लोकांनी किराणा, भाजीपाला आणि औषधांसाठी घराबाहेर पडू नये. या सर्व सेवा लोकांना घरपोच मिळाव्यात यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने सोमवारी पोलिस आयुक्तालयात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. भाजीपाला, किराणा दुकानदार आणि मेडिकल चालकांनी यासह सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

लॉकडाउनच्या काळात करा  अर्थार्जनाचे परफेक्‍ट नियोजन

लॉकडाउन, संचारबंदी असतानाही अनेकजण किराणा, भाजीपाला आणि औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यावर उपाय म्हणून पोलिस आयुक्त शिंदे यांनी सोमवारी आयुक्तालयात मेडिकल चालक, भाजीपाला, किराणा दुकानदारांसोबत चर्चा केली. शहरात 800 हून अधिक मेडिकल आहेत तर तेराशेहून अधिक किराणा दुकानदार आहेत.

#Coronavirus : तो पुण्याहून आला चालत अन्‌ मग...

सर्व नागरिकांनी आपल्या हद्दीतील किराणा दुकानदार, भाजीवाल्याकडेच जावे. किराणा, भाजीपाला घेण्यासाठी घरापासून दूर वाहन घेऊन जाऊ नये. रस्त्यावरची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. दुकानदार, विक्रेते, व्यापाऱ्यांच्या मदतीने होम डिलिव्हरीवर भर देण्यात येत आहे. शहरात मागणीप्रमाणे किराणा माल, भाजीपाला आणि मेडिकल औषधे पुरवठा करण्याची तयारी असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. घरपोच भाजीपाला, किराणा मिळविण्यासाठी 9765222410 आणि 8624894141 या मोबाईल क्रमांकावर, औषधे घरपोच मिळवण्यासाठी 727728 7277 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नागरिकांनी आपल्या घराजवळील किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेत्याकडून माल घ्यावा किंवा आपल्या गरजेनुसार ऑनलाइन मागणी करावी. संचारबंदीच्या काळात होम डिलिव्हरीची सुविधा उत्तम आहे. आपला परिसर सोडून इतर ठिकाणी वाहनावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. भाजी विक्रेत्याकडून परत जाताना रिकाम्या हाताने जाणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. अत्यावश्‍यक सेवेतील लोकांनी तसेच शासकीय कार्यालयातील पाच टक्के कर्मचारी वर्गाने आपली ओळखपत्रे सोबत ठेवावीत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सध्यातरी लोकांनी घराबाहेर पडणे टाळावेच. गाव की मंडी या माध्यमातून आम्ही सोलापूरकरांना घरपोच भाजीपाला देण्यासाठी सज्ज आहोत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. 
- मयूर कोळी, 
घरपोच भाजीपाला पुरवठादार 

कोरोनामुळे लॉकडाउनच्या परिस्थितीत आम्ही जनतेला ताज्या भाज्या व फळे घरपोच देण्याचा प्रयत्न करीत आहोत. जुळे सोलापूर या परिसरातील लोकांना मुबलक प्रमाणात भाज्या व फळे पुरवठा करण्याची आमची तयारी आहे. पोलिसांकडून या उपक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे. 
- वीर ठाकूर, 
घरपोच भाजीपाला पुरवठादार 

संचारबंदी लागू केल्यापासून आम्ही औषधे होम डिलिव्हरी करत आहोत. अनेकांना औषधांसाठी घराबाहेर पडणे शक्‍य नाही. आम्ही आजवर जवळपास 500 लोकांपर्यंत औषधे पोचवली आहेत. पोलिसांकडून होम डिलिव्हरीला प्रोत्साहन मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे. 
- यासीर शेख, 
मेडिकल चालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Delivery Facility at solapur