सोलापूरच्या बाल नाट्य चळवळीने राज्यात कसे मिळवले मानाचे स्थान? ते वाचा 

teleju.jpg
teleju.jpg

सोलापूरः सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण ठरलेली रंग संवाद प्रतिष्ठानची बालनाट्य चळवळ मागील 17 वर्षांमध्ये एक हजार बालकांना नाट्य क्षेत्रामध्ये सहभाग करून घेणारी ठरली आहे. या चळवळीत आता बालकांसोबत त्यांचे पालक व शिक्षकदेखील भरीव योगदान देऊ लागले आहेत. 

सुरुवातीला 2003 मध्ये नाट्यकर्मी व शिक्षिका मीरा शेंडगे यांनी शाळेतील काही मुलांना उन्हाळी सुटीत नाट्य प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. त्या स्वतः बाल नाट्य चळवळीत घडलेल्या नाट्यकर्मी आहेत. स्वतःच्या नाट्यप्रेरणेतून त्यांनी शाळेत शिक्षिका असताना मुलांना त्यांनी नाट्य कलेचे धडे देण्यास सुरुवात केलेली होती. उन्हाळी सुट्यामध्ये देखील याच पध्दतीने मुलांना उपलब्ध असलेल्या वेळेचा उपयोग करून नाट्य प्रशिक्षण शिकवण्यास सुरूवात केली. 

अगदी सुरुवातीला मुलांची संख्या कमी होती. मात्र जी मुले सहभागी झाली ती अगदी छानच पध्दतीने स्टेज डेअरींग, अभिनय, समुहातील स्वतःची भुमीका निश्‍चित करू लागली. टीमवर्कमध्ये काम करताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद पालकांनी अनुभवला. मग मात्र पालकच स्वतःच्या मुलांसोबत मुलांचे मित्र,नात्यातील बच्चे कंपनीला घेऊन येऊ लागली. प्रत्यक्षात तेव्हा थोड्या पालकांनी त्याला प्रतिसाद दिला. नंतर मुले संपूर्ण सुटीमध्ये या प्रशिक्षणात रमू लागली. सुरुवातीला पालकांनी मुलांना नाट्य चळवळीत काय मिळेल, असा विचार केला होता. 
मुलांना स्टेज डेअरींग आले म्हणजे सर्व काही आले असे वाटते. मात्र नाटकासारख्या कलेत सर्वच मुले सहभागी होऊ शकणार नाहीत. म्हणून मीरा शेंडगे यांनी कविता वाचन, अभीवाचन, नाट्यवाचन अशी व्यासपीठे मुलांना उपलब्ध करून दिली. त्यामध्ये मुले मग अधिक उत्साहाने काम करू लागली. या सर्व गोष्टीसाठी कोणतेही व्यावसायिक शुल्क आकारले गेले नाही. एकूण मुलांची होणारी प्रगती पाहून स्वतःच सहकार्याच्या भूमिकेत आले. अनेक शिक्षकदेखील स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झाले. 
अनेक प्रकारची नाटके व्यासपीठावरून सादर होऊ लागली. विं.दा.करंदीकराच्या बालकवितांवर स्वतंत्र कार्यक्रम सादर झाला. साने गुरूजी जन्म शताब्दी वर्षानिमीत्त शामची आईचे नाट्य रुपांतर रंग संवादच्या मुलांनी सादर केले. या पध्दतीेने मुले अगदी पाचवीला या वर्गात दाखल झाली की ते दहावीपर्यत या वर्गात कायम टिकून राहू लागली. महाविद्यालयात गेलेल विद्यार्थी पुन्हा शालेय विद्यार्थ्यांना नाट्य कला शिकवण्यासाठी पून्हा रंगसंवाद मध्ये दाखल होतात. हा प्रवास कायमपणे सुरू राहीला. 
वर्षभरात ही सर्व मुले अंदाजे साठ नाटयप्रयोग सादर करत असतात. आजुबाजुच्या शहरामध्ये काही नाट्य प्रयोग सादर करण्याची संधी त्यांना मिळते. बाल नाट्य स्पर्धामध्ये सोलापूरची नाटके गाजत होती. अजूनही ही परंपरा नव्या बाल कलावंतांनी कायम ठेवली आहे. 
बालनाटके सादर करण्यासाठी रंग संवादची मुले अन्य शहरातील स्पर्धेसाठी जायला लागली. एकदा प्रशिक्षणात सहभागी झालेली मुले दहावीपर्यंत नियमित सहभागी होतात. महाविद्यालयात गेल्यानंतर हीच मुले प्रशिक्षक म्हणून इतर मुलांना शिकवत आहेत. दरवर्षी अंदाजे 60 बालनाट्याचे प्रयोग सादर केले जातात. आर्या कुलकर्णी, निमिष निपुनगे, ओंकार जिंदे, चतुर्थी बेडेकर यांनी पुढे चित्रपटात अभिनय सादर केला. मोशन इम्पॅक्‍ट नावाचे सोलापूरी बोलीतील नाट्य प्रयोग यु ट्युबवर हे कलावंत सादर करतात. या सर्व प्रयत्नाचा एकत्रित परिणाम म्हणजे सोलापुरला राज्य बाल नाट्य स्पर्धेते मिळालेले विजेतेपद होय. तेलेजू हे बाल नाट्य त्या स्पर्धेत राज्य विजेते ठरले. नंतर शंभराव्या अ.भा.नाट्य संमेलनात हे नाटक निमंत्रीत करण्यात आले होते. 

सुप्त कलागुणांना वाव
सोलापूरमध्ये बालनाट्य चळवळ विकसित झाल्याने अनेक मुले विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो आहे. विद्यार्थ्यांना या माध्यमातून त्यांची कला विकसित करण्याची संधी मिळत आहे. 
- मीरा शेंडगे, ज्येष्ठ नाट्यकर्मी तथा संस्थापक रंग संवाद 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com