बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी 10 लाखांचा दंड; कोठे? वाचा सविस्तर

Pout
Pout

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍याच्या दक्षिण भागातील पौट येथील पाझर तलाव व शेतकऱ्यांच्या शेतातील 1700 ब्रास मुरमाचे बेकायदेशीररीत्या उत्खनन केल्याची तक्रार खंडू शिंदे यांनी केली. तर महसूल खात्याने केलेल्या पंचनाम्यात 240 ब्रासचा उपसा केल्याचे निष्पन्न झाले. 

तालुक्‍याच्या दक्षिण भागातील बहुतांश गावांत पोलिस व महसूल खात्याचे अधिकारी पोचण्यास विलंब होत असल्यामुळे अथवा अवैध धंद्यांबरोबर वाळूची चोरी करण्यास अधिक वाव मिळत असल्यामुळे यामध्ये गाव पातळीवरील काही राजकीय कार्यकर्त्यांनी देखील आपले हात ओले करून घेण्याचा प्रयत्न केला. पौट येथील मूळ जमीन गट क्र. 122 मधील 5.50 इतके क्षेत्र पाझर तलावासाठी संपादित करण्यात आले असून, या तलावाबरोबर वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम शासनाची कोणतीही परवानगी अथवा रॉयल्टी न भरता उचलून नेला. शेतकऱ्याच्या शेतात मोठमोठे खड्डे पडल्याने ते क्षेत्र नापीक झाले. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे खात्याच्या या विभागाकडे अनेक पदे रिक्त असल्यामुळे तसेच मंगळवेढ्यातील कारभार मोहोळ येथे चालू असल्याने याकडे लक्ष देण्यासाठी अधिकारी फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना अधिकचा उपसा करण्याची संधी मिळाली. दरम्यान, याच तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे 1700 ब्रास वाळू उपसा झाल्याची तक्रार दिल्यानंतर महसूल खात्याने मंडलाधिकारी मार्फत याबाबत चौकशी केली असता त्यामध्ये कमी उपसा झाल्याचे सांगण्यात आले. 

याबाबत हुलजंतीचे मंडलाधिकारी सत्यवान घुगे म्हणाले, आम्ही केलेल्या चौकशीत 240 ब्रास मुरूम उपसा केल्याचे निष्पन्न झाले असून, याबाबत त्यांना दहा लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. दंड न भरल्यास त्याच्या सातबारावर बोजा चढवण्यात येणार आहे. 

लघु पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता विलास भोसले म्हणाले, गाळमुक्त तलावासाठी या पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी आम्ही परवानगी दुसऱ्याच शेतकऱ्याला दिली. संबंधित शेतकऱ्याला आम्ही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे केलेला उपसा हा बेकायदेशीर आहे. 

विनापरवाना मुरूम उपसा करताना आईवडिलांनी अडवले असता शासनाची परवानगी आहे, असे सांगून शेतातील व तलावातील मुरमाचा उपसा केला. परवानगी असली तर दंडाची नोटीस बजावली नसती, असे तक्रारदार खंडू शिंदे यांनी म्हटले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com