कोरोनाच्या सावटात बरसल्या अक्षता ; हर्र बोला...चा जयघोष उत्साहात 

sss.jpg
sss.jpg

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचा अक्षता सोहळा बुधवारी दुपारी 50 भक्त आणि मानकऱ्यांच्या उपस्थित पार पडला. मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला. 

रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत सिद्धरामेशवर आकर्षक मूर्ती होती. चारही बाजूंनी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकाही भाविकांस प्रवेश दिला जात नव्हता. सर्व भाविकांना दुरुनच पालखीचे दर्शन घेतले. पालखी मार्गावरून जाताना भाविकांच्या मुळातून श्री सिद्धाराम यांचा जयजयकार करताना भाविक दिसून आले. भाविकांच्या मुखी चाललेल्या श्री सिद्धरामांच्या जयजयकारात पालखीचे संमती कट्ट्यावर आगमन झाले. 
कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील सात महिन्यापासून राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे कार्यक्रम यांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात कोरोनाची खबरदारी घेत राज्य शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. योगदंड आणि पालखीनी सजविलेल्या रथात पालखी ठेवण्यात आली होती. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर हिरेहब्बू वाड्यातून सर्व विधी झाल्यानंतर दुपारी 11.45 वाजता गाडीने संमती कट्ट्यावर आणण्यात आले. त्यानंतर गंगा अन्‌ संमती पूजनानंतर मानकरी सुहास शेटे यांनी म्हटलेल्या प्रत्येक मंगलाष्टकानंतर 50 मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत अक्षतांचा वर्षाव करण्यात आला. मंगलाष्टका सुरू असताना सर्व भक्तांनी बोला, बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला , हर्र... श्री सिद्धेश्वर महाराज की जय'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. 
मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी सोहळा वेळेवर पार पडला. सोहळा आटोपून मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दुसऱ्याही वर्षी आपली परंपरा कायम ठेवली. 
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी अक्षता सोहळ्यासाठी बुधवारी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच नंदीधवज मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाविकांची मोठी गर्दी होती. योगसमाधी आणि गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन घेणयासाठी मानकरी आणि पुजारी यांनी घेतले. कोरोना महामारीमुळे यंदाही अक्षता सोहळा वेळेतच, झाला असल्याची माहिती राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. 
तत्पूर्वी सकाळी आठ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यातील धार्मिक विधीनंतर नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले. हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणूक न काढता अक्षता सोहळ्यासाठी मंदिर परिसरातील संमती कट्ट्याकडे गाडीने मार्गस्थ झाले. कोणत्याही वाद्यांचा व हलग्यांचा आवाज ऐकू आला नाही. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा, पंचरंगी ध्वज फडकत होता. 
दरवर्षी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी नंदीध्वजांना खोबऱ्याचे हार, बाशिंग बांधण्यासाठी भाविक थांबलेले असत यंदा, मात्र कोरोना महामारीमुळे नंदीधवजच नसल्याने अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर एक निराशा जाणवत होती. कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये, म्हणून फक्त 50 व्यक्तींना पास देण्यात आले होते. 
हिरेहब्बू वाडयापासून निघालेली मिरवणूक बाबा कादरी मशीद, दाते गणापती मंदिर, राजवाडे चौक, दत्त चौक, माणिाक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, सिध्देश्‍वर प्रशाला, रिपन हॉलमार्गे संमती कट्ट्यावर येताच पुढील विधी पार पडले. सोहळ्यास येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दर वर्षी सुमारे एक सुमारे तासभर होणार अक्षता सोहळा यंदा केवळ 6 मिनिटात पार पडला. अक्षता सोहळ्याची सांगता 11.30 मिनिटांनी झाली. 
यावेळी खासदार जय सिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाविकांमध्ये बसून अक्षता सोहळयास हजेरी लावली होती. यावेळी माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, तम्मा मसरे, महेशा अनारळकर, नगरसेवक किरणा देशामुख उपस्थित होते. 

असे झाले कार्यक्रम 
सकाळी 10:40 वा. समंती कट्टयावर योगदंडाचे आगमन 
सकाळी 10.45 वा. मशाल 
सकाळी 11 वा. गंगा पूजन 
सकाळी 11.10 वा. सुगडी पूजन 
सकाळी 11.13 वा. संमती पूजन 
सकाळी 11.24 वा. संमती वाचन प्रारंभ 
सकाळी 11.31 वा. संमती वाचन समाप्त 

सुचनांचे पालन स्वागतार्ह 
दरवर्षी मोठ्या उत्साहात व लाखोच्या उपस्थित होणारा अक्षता यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे अतिशय साध्या पधदतीने साजरा करण्यात आला. प्रशासनाने तशा सूचना दिल्या होत्या. सोलापूरच्या जनतेने व मंदिर प्रशासनाने त्याचे पालन केले. 900 वर्षाची परंपरा असलेल्या यात्रेस यंदाच्या वर्षी 50 लोकांच्या उपस्थित सर्व कार्यक्रम करण्यात आले. 
- डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, खासदार, सोलापूर 

कोरोनाचे संकट दूर व्हावे 
सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने होणारा अक्षता सोहळा यंदा मात्र कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. सोलापूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या भक्‍तांना दर्शन घेता येत नाही. देशावर आणि राज्यावर तसेच सोलापूरवर आलेले कोरोनाचे संकट लवकरच दूर व्हावे. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com