कोरोना आवरेना ! शहरातील 'या' 18 नगरांमध्ये तीनपेक्षा अधिक रुग्ण; आज दहाजणांचा मृत्यू

002Child_Mask_0_2.jpg
002Child_Mask_0_2.jpg

सोलापूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता मृत्यूदर पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही कोरोना आटोक्‍यात येत नसल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णवाढ आणि मृत्यू वाढणाऱ्या राज्याच्या टॉपटेन शहरात सोलापूरचा समावेश झाला आहे. कोरोना हाताबाहेर जाऊ लागला असून आज 308 रुग्णांपैकी दहाजणांचा मृत्यू झाला आहे.

आयुक्‍तासाहेब जरा लक्ष द्या...
कोरोना वाढत असताना होम क्‍वारंटाईनपेक्षाही इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन वाढविण्यावर भर दिला जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. कोरोना काळात शहरातील को-मॉर्बिड रुग्णांचा घरोघरी जाऊन तिनवेळा सर्व्हेक्षण करण्यात आले असून आता पुन्हा सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. तत्पूर्वी, को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरु केली. तरीही सोलापूर महापालिकेला को-मॉर्बिड रुग्णांचे मृत्यू रोखता आलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.


शहरातील वर्धमान नगर, घोंगडे वस्ती (भवानी पेठ), कोणार्क नगर, नालंदा नगर (विजयपूर रोड), आशिर्वाद अपार्टमेंट (रेल्वे लाईन), नेहरू नगर, सुखस्वप्न अपार्टमेंट (होटगी रोड), महालक्ष्मी नगर (आरटीओ कार्यालयाजवळ), पदमश्री अपार्टमेंट (अवंती नगर), मुरारजी पेठ, जवाहर हौसिंग सोसायटी, अंत्रोळीकर नगर, पावन गणपतीजवळ (दमाणी नगर), द्वारका नगर, उध्दव नगर, दक्षिण सदर बझार, देखमुख-पाटील वस्ती, कल्याण नगर भाग-दोन याठिकाणी तीन अथवा त्याहून अधिक रूग्ण आज आढळले आहेत. होम क्‍वारंटाईनमध्ये सध्या 602 संशयित असून इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये अवघे 54 संशयित आहेत. 33 जण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. शहरातील मृतांची संख्या आता 741 झाली असून एकूण बाधितांची संख्या 16 हजार 699 वर पोहचली आहे. एकूण रुग्णांपैकी 13 हजार 34 जण बरे झाले असून सध्या दोन हजार 924 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक बाबी...

  • शहरात आज दोन हजार 429 संशयितांमध्ये आढळले 308 जण पॉझिटिव्ह
  • आज शहरातील दहा जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू; रुग्णांच्या तुलनेत वाढतोय मृत्यूदर
  • शहरातील 212 ठिकाणी आढळले रुग्ण; झोपडपट्टी, विजयपूर रोड, जुळे सोलापूरसह सर्वच परिसरातील रुग्ण
  • मृतांमध्ये 45 वर्षांवरील व्यक्‍तींचा समावेश; निराळे वस्ती परिसरातील अनोळखी मृत व्यक्‍तीही कोरोना पॉझिटिव्ह
  • 21 मार्चनंतर उपचारासाठी दाखल झालेल्या दहाजणांचा मृतांमध्ये समावेश; वेळेत उपचार न घेतल्यानेच झाला मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com