पावसाने फळपिकांवर कुजवा, तेल्या व डावणी रोगाचा वाढता प्रादुर्भाव 

दत्तात्रय खंडागळे
Thursday, 13 August 2020

एकीकडे कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकरी सध्याच्या लहरी हवामानामुळे (पावसाने) अधिकच अडचणीत सापडला आहे. गेले दोन दिवस झाले सांगोला शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातही पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवार (ता. 13) रोजी दिवसभर ढगाळ वातावरणाने सूर्यदर्शन झाले नाही. पावसाच्या हलक्‍या सरी दिवसभर सुरु होत्या. या पावसामुळे फळपिकांवर सध्या रोगराईच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डाळिंब पिकांवर कुजवा, तेल्या रोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे तर द्राक्षबागांवर दावण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वातावरणात फळपिकांवर शेतकऱ्यांना फवारणीही करता येत नाही त्यामुळे फळपिकांवर विविध रोगांत वाढच होत आहे. 

सांगोला (सोलापूर): गेले दोन दिवस सांगोला शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागात पडणाऱ्या सततच्या रिमझिम पावसामुळे फळबागांवर रोगराईच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेरलेल्या लहान मकेचे पीक पिवळसर पडू लागले आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असुन अनेक भागात सूर्यदर्शनही झाले नाही. 

हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात 241 नवे कोरोना बाधित ; एकूण 6772 

एकीकडे कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकरी सध्याच्या लहरी हवामानामुळे (पावसाने) अधिकच अडचणीत सापडला आहे. गेले दोन दिवस झाले सांगोला शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातही पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवार (ता. 13) रोजी दिवसभर ढगाळ वातावरणाने सूर्यदर्शन झाले नाही. पावसाच्या हलक्‍या सरी दिवसभर सुरु होत्या. या पावसामुळे फळपिकांवर सध्या रोगराईच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डाळिंब पिकांवर कुजवा, तेल्या रोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे तर द्राक्षबागांवर दावण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वातावरणात फळपिकांवर शेतकऱ्यांना फवारणीही करता येत नाही त्यामुळे फळपिकांवर विविध रोगांत वाढच होत आहे. 

हेही वाचाः पांडुरंगचा शेतकऱ्यांना दिलासा; पोळा सणाच्या पार्श्‍वभुमीवर इतक्‍या रुपयांचा हफ्ता जमा 

सध्या रिमझिम पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये कोणतीच कामे करता येत नाहीत. या अगोदर कोरोनाच्या महामारीमुळे डाळिंबांना खरेदीसाठी व्यापारीही आले नाहीत. या काळात अतिशय कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांना डाळिंबाची विक्री करावी लागली होती. सध्याच्या परिस्थितीत बहरलेल्या फळबागांवर तसेच परिपक्व झालेल्या डाळिंबावरही तेल्याचा मोठा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तेत्या रोगामुळे अनेक जणांच्या संपूर्णपणे भागात नष्ट झाल्या आहेत. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप डाळिंबीचा ऑगस्ट बहारही धरला नाही. काही भागात पाणी साचून राहिल्याने लहान असलेल्या मका पीकही पिवळसर पडू लागली आहे. पेरणी केलेली मका पिकाची उगवण होईल की नाही ते सांगता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला या वातावरणाने अधिकच आर्थिक संकटात टाकले आहे.  

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased incidence of rot, oilseeds and blight on fruit crops due to rains