"पांडुरंग'चा शेतकऱ्यांना दिलासा; पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर "इतक्‍या' रुपयांचा हप्ता जमा

मनोज गायकवाड 
Thursday, 13 August 2020

गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यात उसाचा तुटवडा होता. परंतु श्री पांडुरंग कारखान्याने 2019-20 च्या हंगामात सात लाख 100 टन उसाचे गाळप करून सरासरी 11 टक्के साखर उताऱ्याने सात लाख 63 हजार 190 क्विंटल साखर उत्पादन घेत उद्दिष्टपूर्ती केली होती. कोविड महामारीच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना श्री पांडुरंग कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला पोळा सणासाठी प्रती टन 200 रुपयांचा हप्ता दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

श्रीपूर (सोलापूर) : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामातील उसाला प्रती टन 200 रुपयांचा हप्ता दिला आहे. त्यासाठी कारखान्याने सुमारे 14 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. 

हेही वाचा : भोसेच्या पाटील घराण्यावर नियतीचा क्रूर घाला; तेरा दिवसांत तीन कर्त्या माणसांचा मृत्यू 

कारखान्याचे संस्थापक - अध्यक्ष सुधाकर परिचारक व आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पांडुरंग कारखान्याने नेहमीच शेतकरी व कामगार हिताला प्राधान्य दिले आहे. केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार पांडुरंग कारखान्याची गेल्या हंगामाची एफआरपी दोन हजार 506 रुपये प्रती टन आहे. या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाला यापूर्वी दोन हजार 100 रुपये प्रती टन प्रमाणे एकरकमी ऊसबिल दिले आहे. सध्या पोळा सणासाठी शेतकऱ्यांना 200 रुपयांप्रमाणे बिलाचा हप्ता दिला आहे. एफआरपीची उर्वरित रक्कम लवकरच दिली जाणार आहे. केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार आतापर्यंत 92 टक्के रक्कम कारखान्याने अदा केली आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग! अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राचा प्रस्ताव विद्यापीठातच धूळखात पडून 

गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यात उसाचा तुटवडा होता. परंतु श्री पांडुरंग कारखान्याने 2019-20 च्या हंगामात सात लाख 100 टन उसाचे गाळप करून सरासरी 11 टक्के साखर उताऱ्याने सात लाख 63 हजार 190 क्विंटल साखर उत्पादन घेत उद्दिष्टपूर्ती केली होती. कोविड महामारीच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना श्री पांडुरंग कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला पोळा सणासाठी प्रती टन 200 रुपयांचा हप्ता दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, गळीत हंगाम 2020-21 सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे लवकरच पूर्ण करून गाळप हंगाम वेळेवर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षमपणे उभारली असून या यंत्रणेला पहिल्या ऍडव्हान्स हप्त्याचे वाटपही पूर्ण केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Pandurang factory tranfered an installment of two hundred rupees in farmers account