नरेंद्र मोदींनी युवकांना देशोधडीला लावले : शिवराज मोरे; युवक कॉंग्रेसचे जेलभरो आंदोलन

श्रीनिवास दुध्याल 
Thursday, 10 September 2020

प्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे कुटीर, लघू व मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंद्यांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाउनमुळे 12 ते 13 कोटी लोक बेरोजगार झाले. तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्‍कील झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. 

सोलापूर : युवकांना वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले होते. पण रोजगार द्यायचे सोडून यांच्या चुकीच्या धोरणामुळे असलेल्या नोकऱ्या जात आहेत. नोटाबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होऊन युवक देशोधडीला लागले आहेत, अशी टीका प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली. 

हेही वाचा : कौतुकास्पद! "कॅम स्कॅनर' बंद झालं म्हणून नाराज होऊ नका, त्याला टक्कर देण्यासाठी आलंय सोलापूरचे "स्कॅन इट इंडिया'! 

सोलापूर शहर युवक कॉंग्रेसने वाढत्या बेरोजगारीविरोधात, युवकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी आज (गुरुवारी) निदर्शने केली. महराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर निदर्शने करूण जेलभरो आंदोलन केले. या वेळी "नरेंद्र मोदी रोजगार दो, भाजप सरकार रोजगार दो, रोजगार दो या जेल भेज दो' अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या दोनशे पदाधिकारी व युवकांना अटक केली. 

हेही वाचा : युवक कॉंग्रेसतर्फे "रोजगार दो'साठी "मिस कॉल' आंदोलन 

या वेळी बोलताना प्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे कुटीर, लघू व मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंद्यांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर 13 ते 27 टक्‍क्‍यांवर पोचला होता. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाउनमुळे 12 ते 13 कोटी लोक बेरोजगार झाले. तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्‍कील झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. 

आंदोलनात दक्षिण सोलापूर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, कार्याध्यक्ष पंडित सातपुते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, राजासाब शेख, राहुल वर्धा, राहुल गोयल, महेश लोंढे, अमोल भोसले, संतोष अट्टेलुर, सुभाष वाघमारे, हितेश कुकरेजा, जावेद कुरेशी, किरण राठोड, तनवीर इनामदार, सिद्धान्त रंगापुरे, घायल करगुळे, धर्मराज गुंडे, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, चंद्रकांत पागे, अभिषेक गायकवाड, मोनेश घंटे, मौलाली इंगळगी, भीमा बज्जर, मनोहर माचर्ला, नरेश एलूर, शिवराज कोरे, इरफान शेख, श्रीकांत गायकवाड, अजय अवलूर, गजानन मोरे, राजू वाघमारे, बसू कोळी, शशी उपाध्ये आदींसह पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jail bharo agitation on behalf of Solapur City Youth Congress for employment demand