रविवारी जनता कर्फ्यू : कुठे? वाचा सविस्तर

Curfew
Curfew

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरातील कोरोनाची वाढती संख्या पाहता शहरवासीयींमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवारी (ता. 5) एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आयोजित केलेल्या बैठकीत ठरले असल्याची माहिती नगर परिषदेचे माजी प्रथम नगराध्यक्ष तथा ओबीसीचे राज्य समन्वयक रमेश बारसकर यांनी दिली. 

मोहोळ हा सोलापूरपासून सर्वांत जवळचा तालुका आहे. मात्र गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून शहरात कोरोनाची झपाट्याने लागण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, तर प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषद पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बुधवारी नगराध्यक्ष शौकत तलफदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात उपाययोजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने ग्रामीण रुग्णालय किंवा नगर परिषद प्रशासनाला स्वतःहून माहिती द्यावी, होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडू नये, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, व्यापाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, पानटपऱ्यांमधून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. 

नगर परिषद प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून शहर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तोंडाला मास्क लावावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. या वेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील, नगरसेवक प्रमोद डोके, सत्यवान देशमुख, कुंदन धोत्रे, सीमा पाटील, संतोष सुरवसे, अण्णा फडतरे, बिलाल शेख आदींसह नगर परिषदेचे कर्मचारी व इतर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com