वेदनेच्या काळोखात इतरांसाठी जगण्याचा न्याय ठरला भारी ; डॉ. निर्मलकुमार तापडिया यांचा लढा  

suryodaya.jpg
suryodaya.jpg

सोलापूरः मी दवाखान्यात जेव्हा कोरोनाने ऍडमिट झालो तेव्हा या स्थितीत माझ्याजवळ काय आहे याचा विचार केला. तेव्हा आठवले की मी फक्त कोरोना रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत त्या रुग्णांच्या शुभेच्छाशिवाय माझ्याजवळ हाती काही नव्हते. अखेर माझा निकाल माझ्या रुग्णांच्या सदिच्छांच्या बाजुने लागला. वेदनांच्या काळोखानंतर जीवनसुर्य पुन्हा एकदा उगवण्याची घटना मी मुकसाक्षीदार बनून अनुभवली, या शब्दामध्ये डॉ. निर्मलकुमार तापडिया त्यांचा कोरोनामुक्तीचा प्रवासाची कहानी सांगत होते. 

येथील आश्‍विनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मलकुमार तापडिया यांनी त्यांच्या कोरोना आजाराच्या बाबत झालेला घटनाक्रम विशद करत होते. 
मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा अचानक रुग्णांच्या उपचाराचे आव्हान निर्माण झाले होते. शहरात कोरोना आजाराने हाहाकार उडाला होता. अचानक ऍम्ब्युलन्समध्ये लोक येताना त्याचे मृतदेह पोहचत असत. उपचाराचे व्यवस्थापन व निश्‍चित औषधीचा उपयोग या बाबत अनिश्‍चिततेचा तो काळ होता. औषधांच्या बाबत स्थानिक मदत मिळत नव्हती. सातत्याने उपचाराच्या धावपळीत आपण खुप जास्त प्रमाणात कोरोना संसर्गाला तोंड देत आहोत त्यामुळे कोरोना होणार हे लक्षात येत होते. 

पंधरा ते अठरा तास उपचाराचे काम केल्यानंतर घरी येऊन पून्हा उपचाराचे अपडेटस व संशोधने पाहावी लागत असत. घरच्यांना बाजुला ठेवून मी स्वतंत्र खोलीत राहत होतो. एक दिवस अचानक अंग दुखायला लागले पण कामाचा थकवा असेल म्हणून दुर्लक्ष केले. अन्नाची चव लागेनाशी झाली. सिटीस्कॅन मध्ये मला कोरोना झाला आहे हे लक्षात आले. तातडीने मी व घरच्यांची टेस्ट झाली. मी व माझी पत्नी दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. पुण्याच्या मित्रांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे ठरवले. घरची मंडळी घाबरून गेलेली होती. 
उलट्या, ताप, दम या लक्षणांनी मी अगदी पूणपणे ग्रासलो गेलो होतो. मला आयसीयुमध्ये नेण्याचा निर्णय झाला. तेथून माझ्या वेदनांचा प्रवास सुरू झाला. संपुर्ण शरिरात होणाऱ्या अनामिक वेदनांनी मी वेढला गेलो होतो. आज नियतीसमोर आपण डॉक्‍टर असलो तरी रुग्ण म्हणून उभा होतो. या वेळी माझ्या जवळ काय आहे याचा विचार केला तर मी कोरोना रुग्णांवर जीवाची पर्वा न करता उपचार केले होते. या कोरोना विरुध्द मी रुग्णांसाठी लढत असताना त्याच्यासोबत लढाईची वेळ कधीतरी येणारच हे गृहित धरलेले होते. त्या कार्याची शुभेच्छांची पुंजी माझ्या हातात होती एवढेच आठवले. अनिश्‍चिततेचा भोवरा माझ्या भोवती फिरत होता. मनासमोर नियतीच्या नाट्याचा अदभूत प्रयोग सुरू झालेला होता. मी डॉक्‍टर असलो तरी रुग्ण म्हणून आता या प्रयोगाचा साक्षीदार होतो. मनावरचा ताण वाढलेला होता. पण मी त्याला सामोरे जाण्याचे ठरवले होते. तसेच या नाट्याचा निकाल काय लागेल याचा विचार मी काही प्रमाणात बाजुला ठेवत डॉक्‍टरांच्या आत्मविश्‍वासाच्या सकारात्मकतेच्या बाजूला माझे मन झुकवलेले होते. मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. समीर जोग, डॉ. भीवरे, डॉ.परिक्षीत प्रयाग व डॉ. कपिल बोरावके आदींचा आत्मविश्‍वास व त्यांच्या उपचाराचे व्यवस्थापन जबरदस्त होते. पाचव्या दिवशी अचानक शरीरातील वेदनांच्या वादळामध्ये मला भुक लागल्याचे जाणवले. त्याच क्षणी मी ओळखले मी आता कोरोनातून बाहेर पडण्याचा प्रवास सुरू झाला. मी सामान्य होण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी मला माझ्या सोलापूरच्या दवाखान्यातील प्राथमिक स्थितीतील उपचार यंत्रणा व मंगेशकर रुग्णालयातील यंत्रणा यातील फरक लक्षात आला. माझ्यातील डॉक्‍टर पूर्णपणे जागा झाला. मी सोलापूरात उपचार यंत्रणेतील बदलाच्या बाबत तातडीने माझ्या टिमला कळवण्यास सुरुवात केली. हे बदल जेवढे लवकर होतील तेवढे ते सोलापूर शहरातील रुग्णांसाठी अधिक उपयोगी होणार होते. तेथील डॉक्‍टरांच्या आत्मविश्‍वासाची भावना मला सोलापूर शहरात तातडीने पोचवणे आवश्‍यक होते. या बदलासाठी माझ्यासारखा पेशंट सर्वाधिक उत्तम माध्यम होता. मी तातडीने हे काम पूर्ण केले. माझ्याकडून डॉक्‍टर नियमित दिर्घ श्‍वास,अनुलोम-विलोम, प्राणायाम असे श्‍वसनाचे व्यायाम करून घेत होते. या कोरोना अनुभवाने कोरोना रुग्णांच्या वेदना व दुःखाशी मी आता खुप अधिक एकरुप झालो आहे. त्यांच्या उपचारासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुंजी माझ्यासाठी आता अनमोल बनली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com