किसान रेल्वेने अकराशे टन डाळिंबाचा माल पोहोचला उत्तर भारतातील बाजारपेठेत 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 13 September 2020

पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेली किसान रेल, पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी डाळिंब उत्तर भारतात वाहून नेते. आतापर्यंत गेल्या एका महिन्यात 1100 टनपेक्षा जास्त वाहतूक झाली आहे. स्वस्त आणि वेगवान वाहतुकीच्या मार्गाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत आहे. 

सोलापूरः किसान रेल्वेच्या माध्यमातून आतापर्यंत अकराशे टन डाळिंब उत्तर भारताच्या बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यात आला आहे. या रेल्वेची सेवा आता आठवड्यातून तीन वेळा करण्यात आली आहे. 

हेही वाचाः कांदा बियाणांच्या दरात झाली दुपटीने वाढ 

पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेली किसान रेल, पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी डाळिंब उत्तर भारतात वाहून नेते. आतापर्यंत गेल्या एका महिन्यात 1100 टनपेक्षा जास्त वाहतूक झाली आहे. स्वस्त आणि वेगवान वाहतुकीच्या मार्गाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत आहे. 
नाशवंत माल जसे डाळींब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून केली जात आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी 1124.67 टन डाळिंबची वाहतूक केली आहे. ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे 61 टक्के आहे. 

हेही वाचाः राजेवाडी तलाव सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला 

किसान रेल्वे ता.7 ऑगस्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली आणि त्यानंतर सांगोला व पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल त्रि-साप्ताहिक म्हणून चालू आहे. 
डाळिंब या फळांमध्ये एक प्रभावी पोषक घटक आहेत ज्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मते डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील डाळिंबाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 62.91% आहे. 
कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजा डिलिवरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही. रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी व त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आशा व संधी मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वे मुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे आणि ताजी वस्तू कमी वेळेत बाजारात जात आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kisan Railway delivers 1,100 tonnes of pomegranate to markets in North India