कोळी समाज "पेटला', हक्कासाठी सोलापुरात एकवटला 

प्रमोद बोडके
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

या आहेत प्रमुख मागण्या 
अवैध जातीचा दाखला, बनावट जातीचा दाखला याची व्याख्या 2001 च्या कायद्यामध्ये सविस्तर स्पष्ट करावी. महादेव कोळी व कोळी महादेव हे एकच असल्याने जातीचे प्रमाणपत्र देताना शाळा सोडल्याचा दाखला महादेव कोळी असले तरीही जात प्रमाणपत्र देताना कोळी महादेव असे देण्यात यावी असा असा शासन निर्णय घ्यावा, जातीचा दाखला देताना 1950 पूर्वीचा पुरावा देण्यासंदर्भात असा आग्रह करू नये, जातीचा दाखला देताना क्षेत्रीय बंधनाची अट घालू नये जातीचा दाखला देताना चालीरीती च्या अटी वरून जातीचा दाखला द्यावा, जात प्रमाणपत्र पडताळणीचे निकष अनुसूचित जाती व जमातीसाठी एकच निकष असावेत, जात पडताळणी कार्यालय जिल्हास्तरावर असावे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. 

सोलापूर : कोण म्हणतयं देत नाही....घेतल्याशिवाय रहात नाही. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे...आम्ही अनुसूचित जमातीचे नाहीत तर मग...मायबाप सरकार तुम्हीच सांगा आमची जात कोणती? हर हर महादेव, जय वाल्मीकी यासह अनेक घोषणांनी आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. पिवळ्या आणि भगव्या झेंड्यांनी सोलापुरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सोलापूर व परिसरातील जिल्ह्यांमधील महादेव कोळी समाजाचे दाखले अमान्य होत असल्याने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांवर गंडांतर येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद झाली. जातीसाठी व जातीच्या हक्कासाठी आक्रमक झालेला कोळी समाज आज रस्त्यावर उतरला होता. 

aschim-maharashtra-news/solapur/solapur-municipality-will-give-ncp-loyalists-opportunity-elections">हेही वाचा - सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी देणार निष्ठावंतांना संधी 
महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 21 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय घेऊन सेवेत कायम असलेल्या अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त करून त्यांना अकरा महिन्यांची तात्पुरती नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील साठ हजार कर्मचारी व त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या निर्णयामध्ये सेवा विषयक लाभ सेवा निवृत्ती नंतरचे लाभ पदोन्नतीचा लाभ देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद केलेली नाही तातडीने शुद्धिपत्र काढून कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवून मिळणारे वेतन सेवानिवृत्ती वेतन सरळ सेवा भरती चे सर्व फायदे त्यांना द्यावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. 
हेही वाचा - तुमच्या मोबाईलमध्ये हे धोकादायक ऍप्स्‌ आहेत का? 
सोलापूर बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हर हर महादेव आणि जय वाल्मीकी असा असलेल्या भगव्या टोप्या मोर्चेकऱ्यांनी घातल्या होत्या. पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या झेंड्यांचा मोर्चामध्ये समावेश होता. या मोर्चाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या प्रसंगी प्रा. अशोक निंबर्गी, अरुण लोणारी, संजयकुमार कोळी, सुधाकर सुसलादी, अंबादास कोळी, नागेश बिराजदार, सिद्धार्थ कोळी, गणेश कोळी, विश्वनाथ कोळी, रवी यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Koli community united in Solapur for the rights