कोरोनामुळे शाळेच्या बदलत्या वातावरणात मुले स्वकेंद्री होण्याची भीती

children.jpg
children.jpg

सोलापूरः लॉकडाउननंतर सुरू होणाऱ्या शाळांतील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे एकाकी अध्यापन करावे लागणार आहे. त्यामुळे मुले स्वकेंद्री व एकलकोंडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मुलांच्या या संदर्भात होणाऱ्या वर्तन समस्यांचे आव्हान उभे राहिले आहे. 

विद्यार्थ्यांचे शाळाप्रवेश सुरू झाले आहेत. त्यानंतर आता शाळेत विद्यार्थ्यास कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एकाकी पद्धतीने अध्यापन करावे लागणार आहे. एक बेंचवर एकच मुलगा असणार आहे. सॅनिटायझेशनची सुविधा केली जाईल. या विद्यार्थ्यांना एकत्र खेळण्याची देखील मुभा ठेवली जाणार नाही. संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाईल. तसेच मध्यंतरात एकत्र डबा न खाता सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करून बसवावे लागणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी परस्परांना वही व पेनची देवाण घेवाण करू नये म्हणून देखील काळजी घेतली जाणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या सर्वच उपाययोजना निश्‍चित करूनच शाळांना सुरवात केली जाणार आहे. इतर जिल्ह्यांत कोरोना संसर्ग कमी झाल्यास या उपाययोजना एवढ्या कडक असणार नाहीत. सोलापूरला मात्र या अटींशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. अशा स्थितीत मुलांना मास्क लावण्याचे देखील प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. मुलांनी चेहऱ्याला हात लावू नये, इतर मुलांपासून सुरक्षित अंतर राखावे या गोष्टीच्या सूचना पालक व शिक्षकांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. तसेच पूर्वी विद्यार्थी स्कूल बस व खासगी वाहनातून शाळेत ये-जा करीत असत. आता संसर्ग टाळण्यासाठी तेही जमणार नाही. वाहनातील गर्दी टाळावीच लागणार आहे. एका वाहनात अनेक विद्यार्थी जातात म्हणून वाहनचालकांना देखील ही बाब परवडणारी होती. आता एक किंवा दोन विद्यार्थ्यांना शाळेत पोचवण्याचे काम वाहनचालकांना परवडणारे नाही. अनेक विद्यार्थ्यांना एका वाहनात एकालाच न्यावे लागणार आहे. 
या सर्व नव्या नियमांशी तडजोड करण्यासाठी मुलांवर भरपूरच ताण पडणार आहे. त्यांच्या एकत्र असण्याच्या सहजसुलभ भावनेला हा एक धक्का बसणार आहे. त्याचा मानसिक परिणाम देखील विद्यार्थ्यांना झेलावा लागणार आहे. विशेषतः बालवाडी व प्राथमिक वर्गातील मुलांसाठी हा प्रश्‍न अधिकच गंभीर बनणार आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तन समस्यांमध्ये वाढ होणार असल्याचे मानले जाते. मुलांमध्ये स्वकेंद्रीपणा व एकलकोंडेपणा वाढून अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. 

प्राथमीक गटातील विद्यार्थ्यांची अधिक काळजी 
प्राथमिक वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोरोनाचे संकट व घ्यावयाची काळजी याची वयामुळे अपुरी जाण असणार आहे. त्यांना या मानसिक समस्येला तोंड द्यावे लागू शकते. पालक व शिक्षकांना अगदी चांगल्या पद्धतीने त्यांच्या वर्तन समस्या निर्माण होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. 
- अलका काकडे, बालमानस तज्ज्ञ तथा समुपदेशक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com