पंढरपुरातील 65 एकरात कोविड केअर सेंटर सुरु : गरीब व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना मोफत सुविधा 

corona treatment.jpg
corona treatment.jpg
Updated on

पंढरपूर(सोलापूर) : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच गरीब व अल्प उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मोफत उपचारासाठी सर्व सोयी सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

पंढरपूर नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून 65 एकरमधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये नगरपरिषदेच्या वतीने सुसज्ज व सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, डॉ. प्रदिप केचे, डॉ. धोत्रे, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रांताधिकारी ढोले म्हणाले, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे आणखी आवश्‍यक निधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 29 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आला आहे. या निधीतून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी आवश्‍यक असणाऱ्या वैद्यकीय साधनांची खरेदी करण्यात येणार आहे. येथे गरीब व गरजू रुग्णांनाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मोफत सुविधा उपलब्ध होणार आहेत. तालुक्‍यात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असताना महात्मा फुले जन आरोग्य यांजनेतंर्गत उपलब्ध होणारे बेड हे अत्यंत कमी प्रमाणात असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी 65 एकरमधील सर्व सोयी सुविधायुक्त कोविड केअर सेंटरचा उपयोग होणार असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी मानोरकर म्हणाले, या कोविड केअर सेंटरमध्ये नगरपरिषदेच्या वतीने रुग्णांना आवश्‍यक व चांगली सुविधा देण्यात येणार आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. 
या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजनची सुविधा असणाऱ्या 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना राहण्याची स्वंतत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी आयएमए संघटनेकडून 30 बेड व नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडून 20 बेड व 100 पिपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  

 
 संपादन ः प्रकाश सनपूरकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com