रात्रपाळीच्या कामाने घेतला मजुराचा जीव; दहा चाकी टिपरची धडक

A laborer has died while doing night work on Vairag Road
A laborer has died while doing night work on Vairag Road

वैराग (सोलापूर) : रोडवरील रात्री-अपरात्रीचे काम एका मजुराच्या जीवावर बेतले. दहा चाकी टिपर अंगावरून गेल्याने 19 वर्षीय अविवाहीत मजुराचा दुर्देवी मृत्यू झाला. शुभम बळीराम सुर्वे (वय 19, रा. गावडी दारफळ ता.उत्तर सोलापूर) असे अपघात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या अपघाताची वैराग पोलिसांत नोंद झाली असून टीपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर-बार्शी रोडचे काम मंगळवेढा येथील एस.एम.आवताडे आणि कंपनीने घेतले आहे. या कामावर गावडी दारफळ येथील मजूर काम करतात. महेश विठ्ठल परबत व त्याचा मित्र शुभम बळीराम सुर्वे असे दोघे रात्रपाळीने राळेरास ते शेळगावमध्ये राळेरासपासून दीड  किमी अंतरावर असलेल्या कामावर होते. टिपरला साईड दाखवणे, व मुरूम खाली करून घेण्याचे काम हे दोघे करीत होते. पहाटे साडेतीनच्या दरम्यान मुरूम भरून आलेले दहा चाकी टिपर नंबर MH-13, DQ 4O२ चा चालक मागे रिव्हर्स घेत होता. ड्रायव्हरच्या बाजूस महेश परबत तर किनरच्या बाजूस शुभम सुर्वे होता. त्यावेळी टिपरचालकाने मुरुमाचा ढिगारा पडला आहे. तु टिपर पाठीमागे घेऊ नको, असे ओरडून व बॅटरीने खुनवून ही त्याने हयगयीने व निष्काळजीपणाने टिपर मागे घेत गेल्याने साईड दाखविणारा शुभम चाकाखाली सापडला. 

डाव्या साईडच्या पाठीमागील चाक छातीवरून व डोक्यावरून गेले. त्यावेळी पुढे जाऊन टिपरचालकास टिपर पुढे घे. टिपरच्या चाकाखाली शुभमचा मित्र अडकला आहे. त्यावर टिपर चालकाने टिपर पुढे घेतला असता शुभम जागीच मृत्यू झाल्याचे दिसला. त्यानंतर घडलेली घटना महेशने सुपरवायझर गुरली यांना फोन करून सांगितली. वैराग पोलिसांनी माहिती मिळताच अपघात स्थळाचा पंचनामा करून प्रेताचे शवविच्छेदन करण्यासाठी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. टिपर चालक दुराव रानजीत चंद (रा. बिहार ) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यास ताब्यात घेतले आहे. अपघाताची फिर्याद मित्र महेश विठ्ठल परबत याने वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी व्हळे हे करीत आहेत.        

तो कुटुंबात एकुलता एक
                              
शुभम हा कुटुंबात एकुलता एक होता. मजुरी करून तो कुटुंबाची परिस्थिती सुधारत होता. त्याने काबाडकष्ट करून मेहनत करत होता. मात्र दुर्देवी काळाने माझ्या मित्राचा घात होऊन तो आमच्यापासून हिरावून नेल्याचे महेश परबत आठवण काढून सांगत रडत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com