esakal | "माझा नाईलाज झाला मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला रक्तानं पत्र लिहावं लागतंय"

बोलून बातमी शोधा

blood }

येथील प्रसिध्द वकील विजयकुमार नागटिळक हे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावाचे रहिवासी आहेत.

solapur
"माझा नाईलाज झाला मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला रक्तानं पत्र लिहावं लागतंय"
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर-अनेक वेळा शासनाकडे लेखी मागणी करुन देखील गावाकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील एका वकिलांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चक्क स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे. 

येथील प्रसिध्द वकील विजयकुमार नागटिळक हे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावाचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पंढरपूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत. पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची पार वाट लागली आहे. दररोज या रस्त्यावरुन जाणाऱ्या हजारो लोकांना खराब रस्त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-...

दरम्यान अॅड.नागटिळक यांनी पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसााठी शासनाकडे अनेक वेळा लेखी मागणी केली परंतु त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले.

मा. मुख्यमंत्री..

नाईलाज आहे. रक्ताने पत्र लिहावे लागत आहे. सगळीकडे रस्ते झाले. आमचाच रस्ता होत नाही. खराब आणि खड्डे असलेल्या रस्त्यामुळे आमचे प्रचंड हाल होत आहेत.तेंव्हा मायबाप सरकारला विनंती आहे.आमच्या पंढरपूर, तिर्हे सोलापूर या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करुन जनतेचा दुवा घ्यावा.आमची रस्त्याची मागणी पूर्ण करावी.आम्ही दुसरे काय मागत नाही.फक्त रस्ता मागतोय. तेंव्हा हात जोडून विनंतीआहे.रस्त्याचे काम करावे अशा आशयाचा मजकूर असलेले हे पत्र आहे.

तैमुरला झाला भाऊ, करीनाने दिला गोंडस बाळाला जन्म

पंढरपूर कडे येणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत परंतु पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर या रत्याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक वेळा मागणी करुन देखील लक्ष देण्यात येत नसल्याने आपल्याला नाईलाजास्तव स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागेल आहे, असं अॅड.विजयकुमार नागटिळक म्हणाले.