विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज ! परीक्षेचा अर्ज करताना 'लेजर'ची मुभा 

Ahilyabai_holkar.
Ahilyabai_holkar.

सोलापूर : ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्याकरिता इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचा अडथळा येत आहे. त्यामुळे आयपी ऍड्रेसद्वारे उत्तरपत्रिका वेळेत पोहच होत नसल्याने निकालास विलंब होत असून गुणपत्रिका देण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुढील सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी जोडलेली लेजर झेरॉक्‍स ग्राह्य धरण्याचा निर्णय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला आहे. 


विद्यापीठाकडून बहूतांश फॅकल्टीचा निकाल जाहीर करण्यात आला, परंतु विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. तर फार्मसी व अभियांत्रिकीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असून बुधवारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले आहे. मात्र, निकाल लागूनही विद्यार्थ्यांच्या हाती मार्चमध्ये गुणपत्रिका पडणार आहे. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, निकाल वेळेत लागावेत या हेतूने विद्यापीठाने ऑनलाइन उत्तरपत्रिका पडताळणीचा निर्णय घेतला. त्यानुसार यापूर्वी निकालही जाहीर झाले, मात्र आता इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचा अडथळा येत असल्याने निकालास विलंब लागत असल्याने हा निर्णय घेतल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले असले तरी गुणपत्रिका उशिराने मिळणार असल्याने शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 


व्यवस्थापन परिषदेचा झाला ठराव 
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतरही विद्यापीठाच्या बहूतांश कागदपत्रांवर, प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकांवर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नाव दिसले नाही. विद्यापीठाकडे नामांतरापूर्वीचे शैक्षणिक साहित्य शिल्लक असल्याने शिक्‍के मारुन ते साहित्य वापरण्यात आले. आता उत्तरपत्रिका, गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रांवर अहिल्यादेवींचे नाव असावे, असा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला आहे. आता नामांतरानंतर विद्यार्थ्यांना प्रथमच नव्या गुणपत्रिका मिळणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com