गाईच्या गोठ्यातून दूध दरवाढ मागणीचे मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र; वाचा सविस्तर 

dudh aandolan.png
dudh aandolan.png

बार्शी(सोलापूर)ः दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भाजपा व मित्र पक्षांच्यावतीने 20 जुलै व 1 ऑगस्ट रोजी दुध दरवाढ व दुध भुकटीला अनुदान मिळावे म्हणून दोनवेळा आंदोलन केले. परंतू राज्याच्या आघाडी सरकारने आजपर्यंत कोणताही न्याय दिला नाही व त्याची दखलही घेतली नाही. शेतकरी उध्वस्त होत चालला आहे. या निषेधार्थ मातोश्रीवर पोस्टकार्ड पाठवण्याचा शुभारंभ शुक्रवारी (ता.14) बार्शीतून गाईच्या गोठ्यातून करण्यात आला. 

तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलन तीव्र करून आघाडी सरकारला जाग येण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र, ई-मेल, ट्‌विटर, फेसबुक, व्हाट्‌सअप इत्यादी माध्यमांतून दूध दरवाढ मागणी, दूध भुकटी अनुदान मागणी व निवेदने पाठविण्यात येणार आहेत. 

बार्शीतील दूध उत्पादक शेतकरी जनक टेकाळे यांच्या गायीच्या गोठ्यात आमदार राजेंद्र राऊत व भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री यांना दूध दरवाढ मागणीचे पत्र लिहून ते पोस्टाद्वारे पाठविण्यात आले. 
तालुक्‍यातून दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्री यांना हजारोंच्या संख्येने पत्रे पाठवून, आघाडी सरकारला जागे करून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मागणीचा पाठपुरावा करेल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने करण्यात येणार असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले. 
श्रीकांत देशमुख म्हणाले की, हे आंदोलन बार्शी तालुक्‍यातून सुरू करण्यात आले असून आंदोलनास नक्की यश मिळेल. शेतकरी बांधवांना न्याय मिळेल. न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. 
यावेळी नगराध्यक्ष ऍड. आसिफ तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, पक्षनेते विजय राऊत,उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम,सदस्य अविनाश मांजरे,उमेश बारंगुळे,समाधान डोईफोडे, नगरसेवक विजय चव्हाण, मदन गव्हाणे, शरद फुरडे, कयूम पटेल, महेश जगताप, रमाकांत सुर्वे, संदेश काकडे, राजाभाऊ पोफळे, इमरान मुल्ला, धनंजय जाधव, मेजर मोरे, बाळासाहेब गव्हाणे, विशाल बागल, संभाजी राऊत, प्रशांत खराडे, युवराज ढगे, दिपक ढावारे, पिंटू यादव, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. 
 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com