विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पंढरपूरवासीयांनी अनुभवले निसर्गाचे रौद्ररूप ! 

Lightning strikes
Lightning strikes

पंढरपूर (सोलापूर) : आसमंत दणाणून टाकणारा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने गुरुवारी मध्यरात्री सुमारे दीड तास पंढरपूर परिसरात निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. गेल्या 70 - 80 वर्षांच्या इतिहासात पंढरपूर परिसरात सतत दीड तास विजांचा इतका मोठा कडकडाट झाला नव्हता. रात्री तालुक्‍याला मुसळधार पावसानेही झोडपले. 

कासेगाव भागात 128 मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी 48.3 मिलिमीटर असताना यंदा आतापर्यंत तब्बल 543.15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्‍यात सातत्याने पाऊस पडला. रात्री साडेबाराच्या सुमारास पाऊस आणि विजांच्या कडकडाटाला सुरवात झाली. साधारण दर एक - दोन मिनिटांनी आसमंत हादरवून टाकणाऱ्या विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत होता. झोपलेले बहुतांश पंढरपूरकर विजांच्या प्रचंड आवाजाने झोपेतून जागे झाले. रात्री सव्वा दोनपर्यंत एकापाठोपाठ विजांचा कडकडाट सुरूच होता. गेल्या सत्तर - ऐंशी वर्षांच्या इतिहासात पंढरपूर परिसरात यापूर्वी कधीही इतका वेळ सलग विजांचा कडकडाट ऐकायला मिळाला नव्हता, असे वृद्ध मंडळींनी सांगितले. 

मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग वाढला. पावसाने अक्षरशः पंढरपूर तालुक्‍याला झोडपून काढले. तालुक्‍यात सर्वाधिक 128 मिलिमीटर पाऊस कासेगाव मंडलात झाला. तालुक्‍याच्या अन्य भागात झालेला पाऊस पुढील प्रमाणे : करकंब 10 मिलिमीटर, पटर्वधन कुरोली 5 मिलिमीटर, भाळवणी 42 मिलिमीटर, पंढरपूर 58 मिलिमीटर, तुंगत 20 मिलिमीटर, चळे 71 मिलिमीटर, पुळूज 80 मिलिमीटर. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com