esakal | वाचक संख्या मर्यादित..! मराठी वाचनालयांतून अनुदानाची दुकानदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Limited number of readers, donation shop through Marathi libraries

दरवर्षी सुमारे साडेतीन कोटींचे अनुदान
सोलापूर शहर- जिल्ह्यात 947 ग्रामपंचायती असून त्यापैकी 11 वाचनालये ग्रामपंचायतीद्वारे चालविले जाते. सुमारे 90 हजारांपर्यंत वाचक या वाचनालयाशी संलग्न आहेत. दरवर्षी सुमारे साडेतीन कोटींचे अनुदान दोन टप्प्यात या वाचनालयांना वितरीत केले जाते. वाचकांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले आहे. 
- प्रमोद पाटील, जिल्हा ग्रंथालय समन्वयक, सोलापूर 

वाचक संख्या मर्यादित..! मराठी वाचनालयांतून अनुदानाची दुकानदारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मातृभाषेची (मराठी) गोडी वाढावी, बहूभाषिक महाराष्ट्रात मराठी वाचकांची संख्या वाढावी, भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने राज्यात 15 हजार ग्रंथालये सुरु करण्यात आली. मात्र, मागील पाच-सहा वर्षांत वाचकांची संख्या वाढण्याऐवजी मर्यादितच राहिल्याचे चित्र आहे. वाचनालयांच्या माध्यमातून मराठी भाषेची आवड निर्माण होण्यासाठी सरकार स्तरावरुन ठोस नियोजनाची गरज आहे. मात्र, केवळ अनुदानासाठीच वाचनालये जिवंत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

हेही वाचा - वाहनचालकांसाठी ! बीएस-फोर वाहनांची नोंदणी बंद 

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्याच्या सिमेवरील सोलापुरात तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू व मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. तेलगू, उर्दू, कन्नड भाषिकांनी सोलापुरात अनेक शाळा सुरु केल्या असून त्याठिकाणी मराठीतून शिक्षणाचे धडे दिले जातात. अनेकांनी मराठी भाषा शिकून सोलापुरात व्यवसायही सुरु केले आहेत. सोलापुरातील 11 तालुक्‍यांमध्ये 947 ग्रंथालये असून त्यांना दरवर्षी साडेतीन कोटींचे अनुदान वितरीत केले जाते. अ वर्गातील ग्रंथालयांना दरवर्षी दोन लाख 88 हजारांचे तर ब वर्गातील ग्रंथालयांना एक लाख 92 हजारांचे अनुदान दिले जाते. तसेच क वर्गाला 96 हजारांचे तर ड वर्गाला 30 हजारांचे अनुदान दिले जाते. 11 वाचनालये ग्रामपंचायतींद्वारे चालविली जात आहेत. तालुकास्तरावरील अ वर्गातील वाचनालयांना तीन लाख 84 हजारांचे तर ब वर्गाला दोन लाख 88 हजारांचे आणि क वर्गाला एक लाख 44 हजारांचे अनुदान दिले जात आहे. या वाचनालयांना वर्षातून दोनदा अनुदान वितरीत केले जाते. 

हेही वाचा - मुंबई बाजार समितीसाठी महाविकास आघाडीची गट्टी 

ठळक बाबी... 

  • बहूतांश ग्रंथालये चालकांच्या घरातच : इमारत भाड्याचीही मागणी 
  • काही तास उघडे असलेल्या ग्रंथालयांना वाचकांचा विसर 
  • जुनाट पुस्तके अन्‌ मर्यादित वेळेमुळे वाचकांची संख्या घटली 
  • ग्रंथालय पडताळणी समितीचे कागदोपत्री नियोजन : अनुदानासाठी धडपड 
  • ग्रामपंचायतींकडे वाचनालयाची असावी मालकी : वाचकांची मागणी