या ठिकाणाहून येणारी दारू पोलिसांनी पकडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

पुणे जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत इंदापूर येथील दारू दुकाने सुरू असतात. त्यामुळे अनेक जण इंदापूर येथून देशी-विदेशी दारू खरेदी करून ती सोलापूर जिल्ह्यात आणून विकत आहेत. लॉकडाउनच्या काळातही हा धंदा तेजीत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची तस्करी होत आहे. 

टेंभुर्णी (सोलापूर): देशी-विदेशी दारू चोरून विकण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात घेऊन येत असताना नऊ जणांना टेंभुर्णी पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून 91 हजार 548 रुपयांची देशी-विदेशी दारू व दोन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी असा एकूण दोन लाख 91 हजार 548 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भीमानगर येथील पुलाजवळ टेंभुर्णी पोलिसांनी ही कारवाई केली. 

हेही वाचाः शेतकऱ्यांनी पॅकेज विरोधात केले बांधावर आंदोलन 

पुणे जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत इंदापूर येथील दारू दुकाने सुरू असतात. त्यामुळे अनेक जण इंदापूर येथून देशी-विदेशी दारू खरेदी करून ती सोलापूर जिल्ह्यात आणून विकत आहेत. लॉकडाउनच्या काळातही हा धंदा तेजीत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची तस्करी होत आहे. 

हेही वाचाः भाजपाचा आता हा नारा... 

त्यामुळे टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सोलापूर जिल्ह्यात चोरून दारू आणणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले. त्यात सहायक पोलिस निरीक्षक अमित शितोळे, सहायक पोलिस फौजदार अशोक बाबर, पोलिस हवालदार राजेंद्र डांगे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर तळेकर, पोलिस नाईक हरीश भोसले, पोलिस कॉन्स्टेबल किशोर तळेकर, धनाजी शेळके, अजित उबाळे, घाडगे यांचा समावेश आहे. 
या पथकाने मंगळवारी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान भीमानगर येथील भीमा नदीवरील पुलाजवळ सापळा लावून सोलापूर जिल्ह्यात दारू घेऊन येणाऱ्या नऊ जणांसह चार दुचाकी पकडल्या. त्यांच्याकडून सुमारे 91 हजार 548 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली. सुहास अशोक लटके, सौरभ कृष्णा फाळके (दोघे रा. टेंभुर्णी), सागर राजेंद्र परचंडे व पांडुरंग धोंडिबा गोसावी (रा. पंढरपूर) तर शंकर वामन उबाळे, सूरज सोमनाथ कदम व अक्षय भास्कर गाडे (तिघेही रा. रांझणी) तसेच सचिन नवनाथ इथापे (रा. लोणी, ता. परांडा) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The liquor coming from this place was seized by the police