मोठी बातमी! बंद प्राणी संग्रहालयावर दरमहा "इतका' होतोय खर्च; नियमित मान्यतेसाठी वेट अँड वॉच 

तात्या लांडगे 
Thursday, 3 September 2020

राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, सोलापूर व अकोला येथे प्राणी संग्रहालये आहेत. त्यापैकी औरंगाबाद, सोलापूर व अकोला वगळता अन्य प्राणी संग्रहालयांची मान्यता नियमित करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे सोलापुरातील प्राणी संग्रहालयाचे मूल्यांकन झाले नाही, अशी माहिती संचालक डॉ. नितीन गोटे यांनी सांगितले. 

सोलापूर : केंद्रीय प्राणी संग्रहालयाने सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची दुरवस्था पाहून मान्यता रद्दचा निर्णय घेतला. त्यानंतर 11 मार्च 2019 रोजी सुधारणा करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली. मात्र, सध्या कोरोनामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेले प्राणी संग्रहालय मान्यतेविना असून अद्याप केंद्रीय स्तरावरून पडताळणी झालेली नाही. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे खाद्य आणि देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा तब्बल 18 लाखांचा खर्च केला जात आहे. या खर्चातून प्राण्यांची देखभाल व प्राणी संग्रहालयातील कामे केली जातात, अशी माहिती संचालक डॉ. नितीन गोटे यांनी दिली. 

हेही वाचा : अवैध धंद्यात भागीदारी! पोलिस आयुक्तांनी "या' चार पोलिसांना केले बडतर्फ 

राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, सोलापूर व अकोला येथे प्राणी संग्रहालये आहेत. त्यापैकी औरंगाबाद, सोलापूर व अकोला वगळता अन्य प्राणी संग्रहालयांची मान्यता नियमित करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे सोलापुरातील प्राणी संग्रहालयाचे मूल्यांकन झाले नसल्याचेही श्री. गोटे यांनी सांगितले. केंद्रीय प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्याचा अहवाल 27 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र झू ऍथॉरिटीला पाठविला आहे. त्यानुसार महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. प्राणी संग्रहालयाची पडताळणी लवकर व्हावी, यासाठी केंद्रीय प्राधिकरणाचे सचिव एस. पी. यादव यांच्याकडे पाठपुरावाही सुरू असल्याचे श्री. गोटे म्हणाले. मात्र, प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम राहणार की कायमचे टाळे लागणार, हे पडताळणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा : ऑक्‍सिजनअभावी सोलापुरातील रुग्णालये व्हेंटिलेटरवर; पुरवठ्याअभावी 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले दर 

दरवर्षी एक कोटींचे लागते खाद्य 
प्राणी संग्रहालयातील विविध प्रकारचे प्राणी, पक्ष्यांना दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचे खाद्य लागते. दुसरीकडे प्राणी संग्रहालयाची देखभाल-दुरुस्ती व प्राण्यांचे पिंजरे दुरुस्तीसह अन्य कामांवर 90 लाखांहून अधिक खर्च होतो आहे. महापालिका वर्षातून दोन टप्प्यात प्राणी संग्रहालयासाठी निधी वितरीत करते. ऑगस्टपर्यंत एक कोटींचा निधी मिळाला असून आणखी एक कोटी रुपये मिळायचे आहेत. तत्पूर्वी, प्राणी संग्रहालयाचा दर्जा सुधारण्यासाठी दरवर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र प्राणी संग्रहालयाच्या संचालकांनी महापालिका आयुक्‍तांना दिले आहे. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the Mahatma Gandhi Zoo Park costs rupees two crore every year