अध्यापनाची जबाबदारी आता पालकांवर; स्वयंअध्यनावर असणार भर 

प्रकाश सनपूरकर 
शुक्रवार, 19 जून 2020

विद्यार्थ्यांना शाळांकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जात आहे. ही पुस्तके घेऊन पुढील सूचना येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकामधून वाचन करत धड्यांची उत्तरे लिहावीत. तसेच पाढे वाचन, इंग्रजी शब्द पाठांतर विद्यार्थ्यांनी घरी करायचे आहे. तसेच व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जाणार आहे. हा अभ्यास देखील घरच्या घरी मुलांनी करावा. 

सोलापूर : शाळांमधील शिक्षणासोबत आता कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याची मोठी जबाबदारी पालकांवर या वर्षीपासून असणार आहे. पालकांना शिक्षकांच्या भूमिकेत अध्यापन करण्यासाठी काम करावे लागणार आहे. 

हेही वाचा : फेसबुक लाइव्हद्वारे रविवारी जागतिक योगदिन होणार साजरा 

सध्या शहरातील शाळांतून नवीन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत. शाळांमध्ये पालक त्यांच्या पाल्यासह प्रवेशासाठी येत आहेत. सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाची चर्चा सुरू असली तरी पालक मात्र नियमित शाळेला प्राधान्य देत आहेत. विद्यार्थ्यांना शाळांकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जात आहे. ही पुस्तके घेऊन पुढील सूचना येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकामधून वाचन करत धड्यांची उत्तरे लिहावीत. तसेच पाढे वाचन, इंग्रजी शब्द पाठांतर विद्यार्थ्यांनी घरी करायचे आहे. तसेच व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जाणार आहे. हा अभ्यास देखील घरच्या घरी मुलांनी करावा. 

हेही वाचा : ग्रहणात काय करावे काय नाही : वाचा सविस्तर 

पालकांची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत वाढली आहे. विद्यार्थ्यांना घरच्या घरी त्यांचा अभ्यास नियमित करून देण्याचे काम पालक करतील. पालकांना शिक्षकांचीच भूमिका बजवावी लागणार आहे. यासोबत या विद्यार्थ्यांचा अभ्यास नियमित होतो किंवा नाही याचीही माहिती शिक्षकांना देण्याचे काम पालक करतील. पालकांना शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती शिक्षकांना द्यावी लागणार आहे. 
नियमित शाळा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कदाचित ऑगस्टमध्ये उघडतील असे मानले जाते. तोपर्यंत विद्यार्थी घरीच अभ्यास करणार आहेत. शाळांमध्ये देखील शिक्षकांना सर्व वर्गामध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी, जादा विद्यार्थी संख्या असल्यास दोन शिफ्टमध्ये शाळा भरवणे, संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रकारच्या सूचनांचे संकलन करण्याचे काम देण्यात आले आहे. ही सर्व कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत. 

शासनाच्या शिक्षण विभागाने दीक्षा हे ऍप तयार केले आहे. विद्यार्थ्यांना या ऍपवरील व्हिडिओ पाहून धड्याबाबत माहिती घेता येईल. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनासाठी होणार आहे. 

विद्यार्थ्यांना आता घरीच बसून अभ्यास करावा लागणार आहे. प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले आहे. पुढील सूचना आल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावले जाईल. 
- शिवाजी चापले, 
मुख्याध्यापक, मार्कंडेय विद्यालय, 
जुळे सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents now have the responsibility of teaching