esakal | सर्व माध्यमाच्या शाळेतून मराठी विषय सक्तीचा व्हावा
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi subjects should be compulsory from all medium schools

फडणवीस सरकारला तसेच देशाच्या पंतप्रधानांना शेकडो पत्रं पाठवण्यात आली आहेत मला वाटतं या मराठी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा होईल आणि हे महाआघाडीचे सरकार मराठी भाषेला निश्‍चितच अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देईल अशी आजच्या मराठी दिनाच्या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे. 

सर्व माध्यमाच्या शाळेतून मराठी विषय सक्तीचा व्हावा

sakal_logo
By
प्रशांत देशपांडे

सोलापूर : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा झाला पाहिजे. या अधिवेशनात मराठी दिनाच्या निमित्ताने घोषणा होईल, अशी अपेक्षा करूयात. मराठी भाषेची सक्ती झाली पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी वारंवार सोलापूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या माध्यमातून अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी केली आहे. 
यापूर्वीच्या फडणवीस सरकारला तसेच देशाच्या पंतप्रधानांना शेकडो पत्रं पाठवण्यात आली आहेत मला वाटतं या मराठी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा होईल आणि हे महाआघाडीचे सरकार मराठी भाषेला निश्‍चितच अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देईल अशी आजच्या मराठी दिनाच्या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे. 
मराठी ही ओळख टिकवणे आपले कर्तव्य आहे. मराठी ही केवळ साहित्यभाषा म्हणून मर्यादित राहून चालणार नाही. ती संस्कारभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा होणे गरजेचे आहे. 
नवे ज्ञानविज्ञान मराठी माध्यमातून सुलभपणे येण्यासाठी तज्ज्ञांकरवी विश्वसनीय आणि प्रमाणभूत साधने उपलब्ध झाली पाहिजेत. ज्ञानविज्ञान, तत्त्वज्ञान आणि कला यांच्यातील संशोधन मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. मराठीला सक्षम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तरुणांची तक्रार सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे मराठी भाषा भ्रष्ट होत आहे, अशी प्रत्यक्ष तक्रार आहे. इंग्रजीचे वाढते प्रस्थ आणि त्या भाषेला मिळणारा सन्मान, त्यामुळे इंग्रजीकडे सगळ्यांचा ओढा असतो. इंग्रजी लिहिता-बोलता आली, तर त्याचे भवितव्य अन्‌ प्रभाव आणि तसे नाही झाले, तर त्याचा आत्मविश्‍वासावर होणारा परिणाम, हे प्रतिदिन आसपास पहाता येते. इंग्रजी शिकवण्यासाठीचे वर्ग आणि उपाय यांनी बाजारपेठ भरलेली आहे. एखाद्याला मराठी शिकायचे असेल, तर त्याला काही सापडत नाही.