अमेरिकन डायमंडच्या देखण्या ज्वेलरी डिझाईनच्या राख्यांनी बाजार फुलला !

प्रकाश सनपूरकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राखीपोर्णिमेचा सण सोमवारी (ता.3) रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने बाजारात नवनविन राख्याचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. सोलापूर बाजारात या वर्षी स्थानिक लॉकडाउन असलयाने दहा दिवस दुकाने बंद होती. त्यानंतर पाचच दिवसात राखीचा बाजार फुलला होता. 

सोलापूर ः अमेरिकन डायमंडने सजवलेल्या राख्या, कपल राखी, वुडन क्राफ्ट प्रकारासारख्या देखण्या राख्या यावर्षीच्या राखी पोर्णिमेचे आकर्षण असणार आहे. राखीचा निर्मितीचा प्रवास आता ज्वेलरी डिझाईनच्या दिशेने होत आहे. 

हेही वाचाः बहिण व भाऊ यांची राखीपोर्णिमेची भेटही होणार दुरापास्त; कोरोना जिल्हाबंदीचा परिणाम 

राखीपोर्णिमेचा सण सोमवारी (ता.3) रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने बाजारात नवनविन राख्याचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. सोलापूर बाजारात या वर्षी स्थानिक लॉकडाउन असलयाने दहा दिवस दुकाने बंद होती. त्यानंतर पाचच दिवसात राखीचा बाजार फुलला होता. 

हेही वाचाः संकटात असलेल्या त्या रुग्णासाठी कोल्हापूर व सातारा जिल्हा रुग्णालयांनी पाठवली औषधी ! 

या वर्षी पारंपारिक राख्यामध्ये गोंडा राखी, स्वस्तिक राखी, रुद्राक्षाची राखी अशा अनेक प्रकारच्या राख्या आहेत. अगदी दहा रुपयापासून या राख्या विक्री होत आहेत. या वर्षी अमेरिकन डायमंडच्या राख्या सर्वाधीक लक्ष वेधून घेत आहेत. अनेक प्रकारच्या खड्यापासून या राख्या सजवलेल्या आहेत. त्यावर केलेल नाजुक कलाकुसर व खड्याची मांडणी यामुळे ही राखी अधिक उठावदार दिसते. 
घड्यांळाच्या प्रमाणे पॅकींग बॉक्‍समध्ये राख्यांची देखणी पॅकिंग केली जात आहे. एखादे देखणे घड्याळ पॅकिंगमध्ये असावे त्या प्रमाणे या राख्या दुकानात सजवलेल्या आहेत. कपल राखी हा गुजराथी परंपरेतील राखीचा प्रकार विशेष आहे. गुजराथी परंपरेत विवाहीत भावाला राखी बांधणारी बहिण भाऊ व वहिनी या दोघांना समोर बसवून दोघांना राख्या बांधते. त्यानुसार दांपत्यासाठी असलेली दोन सुबक राख्यांची जोड पाहण्यास मिळते. 
काही राख्यांसाठी विशेष प्रकारचे वुडन क्राफ्ट केलेले आहे. नाजुक कलाकुसर केलेल्या वुडन क्राफ्टवर राख्या बांधलेल्या आहेत. तसेच पर्सच्या आकाराच्या गडद लाल रंगाच्या पॅकींगवर चमचमणाऱ्या खड्यांच्या राख्या देखील वेगळ्या प्रकारच्या आहेत. या राख्यामध्ये रंगीबेरंगी मणी, खडे, मेटल आर्ट याचा उपयोग अधिक प्रमाणात केलेला आहे. प्रत्येक राखीसाठी रंगीत डबे, बॉक्‍स, प्लॅस्टिक बॉक्‍स अशा पॅकिंगचे प्रकार आता अधिक प्रमाणात वापरले जात आहेत. दिवसेंदिवस राख्यांच्या निर्मितीमध्ये वाढणारी कलाकुसर व सुबकतेला पॅकिंगची जोड देखील महत्वाची ठरते आहे. 

राखी बाजारासाठी वेळ पडला अपुरा 
यावर्षी कोरोना संकट व नंतर सोलापूर शहराचे लॉकडाउन यामुळे राखी बाजार अगदी थोड्या दिवसासाठी भरला आहे. त्यामुळे ग्राहकांना देखील खरेदी करण्यासाठी वेळ अपुरा पडला. 
- रोहित शहा, राखी विक्रेता. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The market of rakhi with beautiful diamond designs!