संकटात असलेल्या 'त्या' रुग्णांसाठी कोल्हापूर व सातारा जिल्हा रुग्णालयांनी पाठवली औषधी ! 

प्रकाश सनपूरकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

थॅलेसिमीया रुग्णांना महिन्यातून दोन ते तीन वेळा रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागतात. शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होत असल्याने सातत्याने रक्तपिशव्याची गरज भासते. 
या रुग्णांसाठी शहरातील काही रक्तपेढ्या नियमित मोफत रक्तपिशव्यांचा पुरवठा करतात. मात्र या रक्तपेढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णांना आटापिटा करावा लागत होता. 

सोलापूर ः कोरोनाच्या काळात थॅलेसिमीया व रक्ताच्या आजाराच्या उपचारासाठी मोठी अडचण झाली असून रक्तपिशव्या व औषधीसाठी पालकांना अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे. या प्रकरणात सातारा व कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयांनी सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने औषध पुरवठा करत केलेली मदत या रुग्णासाठी अनमोल ठरली आहे. 

हेही वाचाः या तालुुक्‍याच्या माजी आमदारांनी तूर, उडिद हमीभाव केंद्राची मागणी ; अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा 

थॅलेसिमीया रुग्णांना महिन्यातून दोन ते तीन वेळा रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागतात. शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होत असल्याने सातत्याने रक्तपिशव्याची गरज भासते. 
या रुग्णांसाठी शहरातील काही रक्तपेढ्या नियमित मोफत रक्तपिशव्यांचा पुरवठा करतात. मात्र या रक्तपेढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णांना आटापिटा करावा लागत होता. 

हेही वाचाः सोलापुरातील 3 हजार 191 रुग्णांनी कोरोनाला हरिवले! आज नव्या 54 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू 

हीच अवस्था हिमोफिलीया रुग्णांची देखील झाली. या रुग्णांना लागणारे रक्त गोठवणारा रक्त घटक फॅक्‍टर एट ची सातत्याने गरज भासते. तसेच हा रक्त घटक दिल्यानंतर तो घरी देखील साठवून ठेवावा लागतो. या रुग्णांस कोणतीही जखम झाली तर रक्त गोठण्याच्या एैवजी वाहू लागते. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांना घरी देखील हा रक्त घटक साठवावा लागतो. 
ग्रामीण भागात असलेल्या अनेक रुग्णांना लॉकडाउनमुळे शहरात येणे शक्‍य होत नव्हते. त्यातच उपचारासाठी असलेली औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नव्हती. 
अशा स्थितीत रुग्णांना औषधी मिळवण्याची अडचण झालेली होती. बाहेर गावी जाण्याच्या अडचणी विशेषतः पूणे येथे ही औषधी वाढत्या कोरोना संसर्गाने वाढलेली होती. कोरोना संकटात रुग्णांच्या पालकांचे अर्थिक संकट देखील गंभीर होते. त्यामुळे खासगी मेडिकलवरून औषधी खरेदी करण्याची सोयच नव्हती. 
तेव्हा या रुग्णांच्या पालकांनी उपचाराच्या सोयीसाठी केलेल्या समवेदना फौंडेशनच्या माध्यमातून पालकांनी मोठे प्रयत्न सुरू केले. तेव्हा राज्यातील सातारा व कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयांनी या प्रयत्नांना प्रतिसाद देत ही औषधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. या दोन्ही रुग्णालयात उपलब्ध असलेला साठा कोरोना संकटामुळे शिल्लक राहिलेला होता. तेव्हा दोन्ही रुग्णालयांनी रुग्णांची माहीती घेत हा औषधी साठा मोफत उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे या रुग्णांना वेळेवर औषधोपचार नाही मिळाले तर त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम दिसून येतात. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medicines sent by Kolhapur and Satara District Hospitals for 'those' patients in crisis!