बहिण व भाऊ यांची राखी पोर्णिमेची भेटही होणार दुरापास्त ; कोरोना जिल्हा बंदीचा परिणाम 

राजाराम माने
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रक्षाबंधनसाठी भाऊ बहिणीकडून ओवाळण्यासाठी बहिणीच्या गावी जात असतो. कित्येक वर्षांची ही परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने व ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती वरचेवर वाढत चालली आहे. तसेच प्रवासासाठीही अनेक बंधने असल्याने रक्षाबंधनासाठी बहिणीच्या गावी जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे मोठे सावट रक्षाबंधन सणावर आले आहे. 

केतूर(सोलापूर): बहिण-भावाचे नाते सांगणारा महत्त्वाचा सण म्हणजे "रक्षाबंधन". या दिवशी भाऊ बहिणीकडे ओवाळणीसाठी जात असतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट वाढत असल्याने जिल्हा बंदी आहे. या जिल्हा बंदीमुळे बहिण भावांची मात्र ताटातूट होणार आहे. 

हेही वाचाः सोलापुरातील तीन हजार 191 रुग्णांनी कोरोनाला हरिवले! आज नव्या 54 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू 

रक्षाबंधनसाठी भाऊ बहिणीकडून ओवाळण्यासाठी बहिणीच्या गावी जात असतो. कित्येक वर्षांची ही परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने व ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती वरचेवर वाढत चालली आहे. तसेच प्रवासासाठीही अनेक बंधने असल्याने रक्षाबंधनासाठी बहिणीच्या गावी जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे मोठे सावट रक्षाबंधन सणावर आले आहे. 

हेही वाचाः संकटात असलेल्या त्या रुग्णांसाठी कोल्हापूर व सातार जिल्हा रुग्णालयांनी पाठवली औषधी 

कोरोनाचे संकट देशावर घोंगावत आहे. ते केव्हा संपेल हे कोणीही सांगू शकत नाही. याही परिस्थितीत काही व्यापाऱ्यांनी राख्यांचे स्टॉल लावले आहेत. परंतु राखी विक्री होण्यासाठी व्यापारी मात्र प्रतीक्षेत आहेत. बाजारात 10 रुपयांपासून ते 80 ते 90 रुपयेपर्यंत राखी विक्रीसाठी आहे. मात्र ग्राहकच नाही अशी परिस्थिती आहे.  
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister and brother will meet Rakhi Purnima soon; Consequences of Corona District Ban