काय आहे "सिंहगड इंजिनिअरिंग' व "पीएसपीआयपी' यांच्यातील सामंजस्य करार? 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 20 जून 2020

देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचारबंदी घालण्यात आली आहे. या संचारबंदी च्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने सामंजस्य करार करण्यात आला असून, या करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना पेटंट घेण्यासाठी, शोध प्रकल्प करण्यासाठी इनक्‍युबेशन डेव्हेल करण्यासाठी मदत होणार आहे. 

भाळवणी (सोलापूर) : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संशोधनास चालना मिळावी म्हणून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज व पीएसपीआयपी असोसिएट्‌स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

हेही वाचा : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी द्या "या' व्यवसायाला परवानगी 

देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचारबंदी घालण्यात आली आहे. या संचारबंदी च्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने सामंजस्य करार करण्यात आला असून, या करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना पेटंट घेण्यासाठी, शोध प्रकल्प करण्यासाठी इनक्‍युबेशन डेव्हेल करण्यासाठी मदत होणार आहे. पीएसपीआयपी असोसिएट्‌स या कंपनीचे डॉ. सूर्यकांत पाटील हे डायरेक्‍टर असून ते पेटंट ऍटॉर्नी म्हणून युरोपियन व आशियन देशांमध्ये काम पाहात आहेत. पीसीटी माध्यमातून पेटंटचे काम 154 देशांमध्ये चालते. 

हेही वाचा : लॉकडाउननंतर दुकाने सुरू, तरी "हे' का आहेत बेरोजगार? 

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत असून, त्यांच्यातील कलाकौशल्य गुण ओळखून त्यांना शिक्षण देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे. शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून भविष्यात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतून संशोधन व्हावेत यासाठी महाविद्यालय सामंजस्य करार करीत आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व संशोधन वृत्तीला खूप मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. 

या सामंजस्य करारांतर्गत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना एक माध्यम मिळणार असून, प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून त्यांच्या अंगभूत असलेल्या कौशल्याचा वापर करून स्वतःची कल्पनाशक्ती वापरून उद्योग निर्मितीसाठी या कराराचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memorandum of Understanding between Pandharpur Sinhagad Engineering College and PSPIP Associates